शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लस्टर गो बॅक’चा ठराव एकमुखाने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:08 IST

काही दिवसांपासून क्लस्टरच्या बाबत सुरू असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही. ठाणे मतदाता जागरण अभियानाने क्लस्टरविरोधात एक परिषद नुकतीच आयोजित केली होती.

ठाणे : काही दिवसांपासून क्लस्टरच्या बाबत सुरू असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही. ठाणे मतदाता जागरण अभियानाने क्लस्टरविरोधात एक परिषद नुकतीच आयोजित केली होती. या परिषदेत क्लस्टर गो बॅकचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.उन्मेश बागवे यांनी हा ठराव मांडला तर त्याला डॉ. चेतना दीक्षित यांनी अनुमोदन दिले. या ठरावात शहरात ठाणे महापालिकेने, महाराष्ट शासनाच्या २०१७ च्या नोटिफिकेशनद्वारे जी समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याचे २६ एप्रिल २०१८ रोजी जाहिरात प्रकाशित करून जाहिर केले आहे. या जाहिरातीत ठाणे शहराचे ४४ झोन करून, याबाबतचे नकाशे तयार केले आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक झोनमध्ये काय केले जाणार याची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही. ती मराठी भाषेत देण्यात यावी. नोटिफिकेशननुसार मालकी हक्क बदलला जाणार असून त्याचे कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, ते देण्यात यावेत, गावठाण व कोळीवाडे यांचे सीमांकन करून, १९८२ नंतर मूळ घरांच्या रचनेत मालकीच्या जागेवर वाढवलेली घरे प्रापर्टी कार्डवर घ्यावीत, मूळ नोटिफिकेशन व यापुढील सर्व माहिती मराठीत देण्यात यावी, ठाणेकर नागरिकांनी हजारोच्या संख्येने ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत. त्या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी व नागरिकांनी मागितलेली सर्व माहिती देण्यात यावी, झोपडपट्टी विकासासाठीच्या विद्यमान योजना सुरू राहणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे ती ताबडतोब खुलासा करून महापालिकेने दूर करावी. जो तपशील मिळतो आहे त्यावरून सध्याची क्लस्टर योजना ही बिल्डर केंद्रीत आहे वास्तविक ती जनता केंद्रीत असायला हवी म्हणून ती रद्द करावी व जनतेशी चर्चा करून नवीन योजना आणावी. तसेच येणाऱ्या महासभेत सर्व नगरसेवकांनी या योजनेस विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले.>विरोध करण्याची मागणीसध्याची क्लस्टर योजना ही बिल्डर केंद्रीत आहे वास्तविक ती जनता केंद्रीत असायला हवी म्हणून ती रद्द करावी व जनतेशी चर्चा करून नवीन योजना आणावी. तसेच आगमी महासभेत सर्व नगरसेवकांनी या योजनेस विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले.