शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या उच्चभ्रू वसाहतींमध्येही पाण्याचा ठणठणाट, रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:23 IST

येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत.

कल्याण : येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने, काही संकुलांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा आधार घेतला जात आहे. पण त्या पाण्याच्या वापरलाही मर्यादा असल्याने पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.बारवी आणि आंध्र धरणांतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा पाहता, लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच १ जानेवारीपासून महिन्याच्या चौथ्या शनिवारीसुध्दा पाणी बंद ठेवले जात आहे. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी कल्याण डोंबिवलीत आधीपासूनच २२ टक्के पाणीकपात लागू केली होती. तेव्हा मंगळवारी पाणी पुरवठा बंद असायचा; परंतू नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार ही कपात सहा तासांनी वाढविण्यात आल्याने आता चौथ्या शनिवारीही पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.दरम्यान, कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथा शनिवार पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही त्याच्या दुसऱ्या दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यात पाणी येण्याची वेळ ठराविक नसल्याने पाणी कधी येते आणि जाते याचाही थांगपत्ता लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याण पश्चिमेकडील छोट्या चाळी आणि इमारतींबरोबरच मोठमोठया गृहसंकुलांनाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. न्यू कल्याण तसेच उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्यामध्ये ७० ते ८० गृहसंकुले आहेत. यातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणी येत आहे. साधारण ७० टक्के रहिवाशांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. प्रामुख्याने आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांसह आजुबाजुच्या परिसरात ही समस्या जाणवत आहे. प्रारंभी ५ ते ६ तास मुबलक पाणी मिळायचे; परंतू आता केवळ दोन तासच पाणी उपलब्ध होत आहे.आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्या अर्ध्याच भरतात. ते पाणी घराघरात पोहोचताना अत्यल्प प्रमाणात मिळते. मंगळवार आणि चौथा शनिवार पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवल्यानंतरही अन्य दिवशी कमी दाबाने पाणी मिळते, हे योग्य नाही, अशा भावना रहिवाशांच्या आहेत. दरम्यान, काही संकुलांतील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अर्जुन भोईर यांची भेट घेऊन पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.काही गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी मिळते ही वस्तुस्थिती आहे. कपातीनंतरही पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशाही तक्रारी आल्या आहेत. कपात वगळता अन्य दिवशी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासंदर्भात नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.- अर्जुन भोईर, स्थानिक नगरसेवक खडकपाडा

टॅग्स :Waterपाणी