शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

पेंडसेनगरमधील रहिवासी वाहतूककोंडीमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:25 IST

‘दक्ष’कडे तक्रारी : अरुंद रस्त्यांमुळे फटका

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दि‌शेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने ठाकुर्लीतील पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे पूर्वेला जोशी हायस्कूल, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, पंचायत विहीर परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे कोंडी होऊन वाहने त्यात अडकून पडतात. सतत हॉर्न वाजवण्यात येत असल्याने ध्वनिप्रदूषणही वाढल्याची व्यथा रहिवाशांनी ‘डोंबिवली : ॲक्शन कमिटी फॉर सिव्हीक ॲण्ड सोशल होप्स’कडे (दक्ष) मांडल्या आहेत.

केडीएमसीच्या निवडणुकीच्या काळात जनतेचा जाहीरनामा जाहीर करण्यासंदर्भात दक्ष समितीने नागरिकांकडे प्रभागनिहाय समस्यांच्या नोंदी संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हाॅट्सॲपवर प्रभागनिहाय ग्रुप तयार केले आहेत. पेंडसेनगरमधील भागातील रहिवाशांनी त्यावर सर्वाधिक समस्या मांडल्या आहेत.

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला येजा करणारी लहान व अवजड वाहने सध्या ठाकुर्ली पुलावरून येजा करत आहेत. त्याचा ताण पेंडसेनगरमध्ये जाणवत आहे. मात्र, आरटीओ, वाहतूक पोलीस अधिकारी ही कोंडी फोडण्यासाठी उपलब्ध नसल्याने आंध्र बँकेच्या चौकात सायंकाळी कोंडी होते. जोशी ते मंजुनाथ शाळांंदरम्यान खड्डे आहेत. रस्त्यांवरील गतिरोधकाची स्थिती योग्य पद्धतीने नाही. गल्ली नंबर ४ व ५ च्या कोपऱ्यावरील स्टॅण्डवर रिक्षांची अस्ताव्यस्त रांग असते. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कोंडीत रुग्णवाहिका, दुचाकी अडकून पडल्यास ते कर्कश हॉर्न अथवा सायरन वाजवतात. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी दिवसरात्र तेथे वाहतूक पोलिसांची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. शिवाय, पोलिसांची गस्तही दिसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आरोग्य समस्येची भीतीनेहरू मैदानात कबुतरांना खायला घातले जाते. त्यामुळे तेथे खेळायला, फिरायला जाणाऱ्या आबालवृद्धांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. डॉ. गुरव यांच्यासमोर मैदानालगत कचरा उघड्यावर टाकला जातो, आदी समस्या नागरिकांनी मांडल्या आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी