शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचे रहिवासी वासाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:28 IST

एमआयडीसी विभागात वायू आणि जलप्रदूषणाने पुन्हा डोके वर काढल्याचे रविवारी दिसून आले. काही दिवसांपुर्वी निवासी भागातील नाल्यांमधून हिरवट रंगाचे पाणी वाहात असताना रविवारी लालसर रंगाचे पाणी वाहात असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. या भागात उग्र वासाने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून घसा खवखवणे आणि डोकेदुखी आदी त्रास सुरू आहेत. 

ठळक मुद्देपाण्याचा प्रवाहही लाल पाण्याचा प्रवाहही लाल : प्रदूषण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : एमआयडीसी विभागात वायू आणि जलप्रदूषणाने पुन्हा डोके वर काढल्याचे रविवारी दिसून आले. काही दिवसांपुर्वी निवासी भागातील नाल्यांमधून हिरवट रंगाचे पाणी वाहात असताना रविवारी लालसर रंगाचे पाणी वाहात असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. या भागात उग्र वासाने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून घसा खवखवणे आणि डोकेदुखी आदी त्रास सुरू आहेत. केवळ एमआयडीसीच नव्हे तर पहाटेच्या वेळी रेल्वे स्थानक परिसर, रामनगरपर्यंतच्या भागात उग्र वास येत असल्याने निम्मी डोंबिवली पुन्हा प्रदूषणाच्या छात्रेत असल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकार सातत्याने घडत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई कुचकामी ठरत असल्याची टीका रहिवाशांनी केली आहे. एमआयडीसी फेज २ नजीकच्या परिसरातील निवासी भागातील मोठय़ा नाल्यातून रविवारी सकाळी गडद लाल रंगाचे पाणी वाहताना आढळून आले. तेथील रहिवाशी विश्‍वास माटल आणि रामदास मेंगडे यांनी याची माहिती तत्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीला दिली. संबंधित यंत्रणेने त्यांचा प्रतिनिधी घटनास्थळी पाहणीसाठी पाठविला. प्रदुषणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती पुन्हा उदभवत असल्याचे ते म्हणाले. कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.