वासिंद हायवे क्रॉसिंग ठरत आहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:08+5:302021-02-24T04:41:08+5:30

वासिंद : मुंबई- नाशिक महामार्गावरील वासिंदजवळील शहरातील दोन्ही दिशांना असलेले क्रॉसिंग धोकादायक ठरत आहेत. भारतीय ...

Residents are finding highway crossings dangerous | वासिंद हायवे क्रॉसिंग ठरत आहेत धोकादायक

वासिंद हायवे क्रॉसिंग ठरत आहेत धोकादायक

googlenewsNext

वासिंद : मुंबई- नाशिक महामार्गावरील वासिंदजवळील शहरातील दोन्ही दिशांना असलेले क्रॉसिंग धोकादायक ठरत आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने महामार्ग चौपादीकरणाचे काम बारा-तेरा वर्षांपूर्वी झालेले आहे; परंतु या महामार्गावरील अनेक महत्त्वाच्या असलेल्या क्रॉसिंगवर ओव्हर ब्रिज न झाल्यामुळे आजमितीस रस्ता ओलांडताना धोकादायक ठरत असून, अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.

मुंबई- नाशिक महामार्ग, मध्ये रेल्वे, भातसा नदीपात्र, कारखाने यामुळे, तसेच शैक्षणिक व ठाणे- मुंबई येथे कामानिमित्त यामुळे वासिंदमधील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहर व परिसरात अनेक गृहसंकुल निवासी प्रकल्प आहेत, तसेच पाड्यावरील नागरिकही बाजार खरेदी, कामासाठी सतत ये-जा करत असतात. मात्र, शहराच्या दोन्ही दिशांना असलेले महामार्गावरील क्रॉसिंग धोकादायक झाले आहेत. वासिंदच्या भिवंडीकडील बाजूने असलेल्या हॉटेल चक्रधारी, तर शहापूरच्या बाजूला हॉटेल फूड मॅक्सजवळील या दोन्ही शहरांत प्रवेशाच्या असलेल्या क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना किंवा गाडी ने-आण करताना भीती वाटते.

--------------------------------------------

संबंधित विभागांनी ओव्हरब्रिजसंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल.

-प्रीतम दामोदरे, शहर सचिव, म.न.से

येथील ओव्हर ब्रिजला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येथे ब्रिज होणे आवश्यक असल्याने यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करणार आहे.

-दौलत दरोडा, आमदार

Web Title: Residents are finding highway crossings dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.