शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडत निघणार मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केले जाहीर : पालिका निवडणुकीतील संभ्रम दूर

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, आरक्षण सोडतीला विलंब होत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित केली असून २५ फेब्रुवारी रोजी सोडत निघणार आहे.

दोन्ही नगरपालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील प्रभाग निश्चित करून त्या आराखड्याला मंजुरी घेणे बंधनकारक होते. मात्र, हा आराखडा मंजूर होण्यास विलंब झाल्याने आरक्षण सोडतीची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या कार्यक्र मानुसार ही आरक्षण सोडत १८ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, आता या दोन्ही नगरपालिकांची आरक्षण सोडत २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सोडत सकाळी १० वाजता पालिका सभागृहात होणार आहे, तर बदलापूर नगरपालिकेची आरक्षण सोडत दुपारी ३ वाजता आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या सोडतीनंतर हरकती घेण्यात येणार आहेत. त्यांची सुनावणी आणि त्याला अंतिम मंजुरीसाठीही मुदत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ मार्चपर्यंत ही मुदत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आचारसंहिता नेमकी लागणार कधी, हा प्रश्न अजूनही राजकीय पक्षांना सतावत आहे.मोठ्या सभागृहात सोडत घ्याच्अंबरनाथ नगरपालिकेच्या पालिका सभागृहात आरक्षण सोडत पार पडणार असल्याने याठिकाणी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवकांना जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे ही सोडत पालिका सभागृहात न घेता शहरातील इतर मोठ्या सभागृहात घ्यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर