शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालवैज्ञानिकांमधून उद्याचे संशोधक घडतील-सवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:54 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.

विक्रमगड : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. विज्ञान प्रदर्शन ही अशीच एक उत्तम योजना असून याद्वारे संधी मिळालेले बाल वैज्ञानिक भविष्यातले संशोधक बनतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी विज्ञान प्रदर्शनावेळी विक्रमगडयेथे व्यक्त केला.पंचायत समिती विक्र मगडच्या शिक्षण विभागाच्या वतीने साखरे इथल्या छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं पारितोषिक वितरण सवरा यांच्या हस्ते झालं. विज्ञान, गणित, पर्यावरण, लोकसंख्या शिक्षण आदी विषयांचा या प्रदर्शनात समावेश होता. सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी १११ साहित्य प्रदिर्शत करून त्यांची शास्त्रीय माहिती दिली.पालघर जिल्ह्यातल्या ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे तिथं शासनाच्या वतीनं विविध सवलती देण्यात येत आहेत. तर जिथं दुष्काळ जाहीर झाला नाही त्यांनाही सवलतींचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.विक्रमगड पंचायत समितीचे सभापती मधुकर खुताडे, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रास्ताविकाद्वारे गट शिक्षणाधिकारी बी.व्ही. मोकाशी यांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली.संधीचा योग्य फायदा घ्यावासवरा म्हणाले, आदिवासी आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील बुद्धिमत्ता, अंगभूत कौशल्य आणि जिज्ञासा असते. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं तर ते देखील जगाशी स्पर्धा करू शकतात हे अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यासाठी या भागातले शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य लाभ घ्यावा असं आवाहन करून पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :scienceविज्ञानvishnu savaraविष्णू सावरा