शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजारांवरील संशोधनासाठी पाच जनावरांवर रोज उपचार करण्याची डॉक्टरांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:29 IST

एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नयेजीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीमएकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन

ठाणे : जनावरांना होणारे जीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीम आता घेतली आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणातील दवाखान्यात रोज कमीत कमी पाच जनावरांवर औषधोपचार करण्याची सक्ती डॉक्टरांना करण्यात आली. एवढेच नव्हे तर उपचार केलेल्या या प्रत्येक जनावराच्या उपचाराची इतंभूत माहितीचा अहवाल त्याच दिवशी केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाकडे अ‍ॅपव्दारे पाठवण्याची तंबी या डॉक्टरांवर केंद्र शासनाने केली आहे.        ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नये. आजारास अनुसरून त्यांच्यावर वेळीच औषधी उपचार होणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर एकाच वेळी उपचार झालेल्या जनावरांच्या आजारांची लक्षणे, त्यावरील उपचार, जनावराचे व मालकाचे आणि गावाचे नाव इत्यादी माहितीचा अहवाल या डॉक्टरांना अ‍ॅपव्दारे रोज केंद्र शासनास आता द्यावा लागणार आहे. एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे. या सक्तीमुळे या डॉक्टरांची पॅक्टीसची गती वाढून त्यात दैनंदिन सक्रियता वाढीस लागणार आहे.प्रत्येक दिवशी देशभरातील डॉक्टरांनी पाच जनावरांवर आजारांच्या लक्षणास अनुसरून केलेला उपचारांवर केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांव्दारे संशोधन केले जाईल. संबंधीत परिसरातील जनावरांनाच्या आजारांचे समान लक्षण दिसून आल्यास केंद्राच्या तज्ञांव्दारे संबंधीत डॉक्टरांना औषधोपचार करण्यचे मार्गदर्शन होईल. एवढेच नव्हे तर कोणत्या कालावधीत, हवामानात जनावरांना कोणत्या आजारास तोंड द्यावे लागते, देशाच्या वेगवेगळ्या भागातील जनावरांवर कोणत्या आजरांचा प्रादुर्भाव होतो. एकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन करून त्यावरील उपाययोजनांचे सखोल मार्गदर्शन डॉक्टरांना देखील करणार आहे. यानंतर सभोतालचे जनावरे या आजारास बळी पडू नये, त्यासाठी वेळीच उपाययोजना, सखोल मार्गदर्शनही या पशूधन डॉक्टरांना केंद्राकडून अ‍ॅपव्दारे मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक विजय धुमाळ व ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. लक्ष्मण पवार यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार