शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवा- आमदार, वकीलांचे पोलीस आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:15 IST

वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असून ही कोंडी सोडवावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

ठळक मुद्देएकमार्गी वाहतूक दुहेरी करावीअनधिकृत वाहतूकीवरही कारवाई व्हावीवाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण

ठाणे: शहरातील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक शाखेने केलेल्या वाहतूकीच्या बदलांमध्ये बदल करावेत, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली. दरम्यान, हीच मागणी अ‍ॅड. ओंकार राजूरकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन केली.गेल्या काही दिवसांपासून नौपाडा, भास्कर कॉलनी भागातील वाहतूक कोंडीबाबत आ. केळकर यांच्याकडे अनेक स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगाने केळकर यांनी स्थानिक नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, डॉ. राजेश मढवी, माजी नगरसेवक संतोष साळवी आणि राजेश ठाकरे यांच्या समवेत पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेऊन हे गा-हाणे मांडले. शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण असतांनाच वाहतूक शाखेने विविध ठिकाणी वाहतूकीत बदल केल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे. वाहतूक शाखेने केलेल्या बदलांमुळे नौपाडा परिसरातील होणारी वाहतूक कोंडी आणि स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नव्याने केलेले बदल तातडीने रद्द करावेत तसेच एलबीएस मार्गावरील हरिनिवास याठिकाणी दुतर्फा बेकायदेशीर उभ्या राहणाऱ्या ट्रक, टेम्पोवर कारवाई करावी आणि गोखले रोडवर लावलेले दुभाजक काढून टाकावेत. तसेच तीन हात नाका येथील बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड काढून टाकावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असेही आश्वासन आयुक्त फणसळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. याशिवाय, जादा प्रवासी नेणाºया तसेच शहरातील विविध वळणावर उभ्या बेकायदेशीरपणे उभ्या राहणा-या रिक्षा चालकांवरही वाहतूक शाखेतर्फे व्यापक मोहीम राबविली जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, नौपाडयात वाहतूक शाखेने केलेले वाहतूकीतील बदल हे फेल झाले असून अनेकदा रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. अनधिकृत वाहतूकीवरही कारवाई करावी, मल्हार सिनेमा समोरील एकेरी वाहतूक पूर्वीप्रमाणेच दुहेरी करावी, या मार्गावरील दुभाजक काढावेत, वाहतूकीची कोंडी सोडविली गेली नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अ‍ॅड. राजूरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी