शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन पक्षातील गटबाजी चव्हाटयावर, एकीकडे युवक आघाडीचा मेळावा तर दुसरीकडे बॅनरला फासले काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:14 IST

रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव्हाटयावर आली आहे.

डोंबिवली, दि. २५ -  रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव्हाटयावर आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या कार्यकत्र्यानी हे कृत्य केल्याचा आरोप युवक आघाडीचे सल्लागार माणिक उघडे यांनी केला आहे तर बॅनरवर पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र इतर मान्यवरांच्या मानाने छोटया आकाराचे लावल्याने कार्यकत्र्याच्या भावना उफाळल्या आणि यातुन हे कृत्य घडल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी लोकमतकडे व्यक्त केली. छापण्यात आलेल्या बॅनरबाबत वरीष्ठांकडे तक्रार केल्याचीही त्यांनी माहीती दिली. रिपाई युवक आघाडीचा मेळावा रविवारी डोंबिवली पुर्वेकडील सर्वेश सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन युवक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पप्पु कागदे यांना पाचारण करण्यात आले होते. युवकचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे आणि राहुल नवसागरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. युवक आघाडीचे सल्लागार तथा रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिक उघडे हे देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान गटबाजीमुळे या कार्यक्रमाला होत असलेला विरोध पाहता प्रमुख मार्गदर्शक कागदे यांनी कार्यक्रमाला न जाणो पसंत केले. एकंदरीतच तणावाचे वातावरण पाहता मेळाव्यापुर्वीच दोन्ही गटांना पोलिसांनी १५९ च्या शुक्रवारी नोटीसा देखील बजावल्या होत्या. परंतू रविवारी मेळावा सुरू असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागातील सम्राट चौकातील ठाकूरवाडीमध्ये या कार्यक्रमाचा लावण्यात आलेला बॅनर दुस-या गटाच्या कार्यकत्र्याकडून खाली उतरविण्यात आला तसेच बॅनरला काळे फासून लाथा बुक्यांनी प्रहार करण्यात आला. याप्रकरणी युवक आघाडीच्या वतीने विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  जाधवांच्या कार्यकत्र्याचे हे कृत्य - उघडे  आम्ही आयोजित केलेल्या मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभल्यानेच विरोधकांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे.  यातूनच बॅनरला काळे फासण्याचे कृत्य प्रल्हाद जाधव यांच्या कार्यकत्र्याकडून घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हे कृत्य करणा-यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिक उघडे यांनी लोकमतला दिली. त्यामुळेच म्हणून कार्यक र्ते भडकले- जाधव  मेळाव्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र लहान तर कागदे यांचे छायाचित्र मोठया आकारात छापले होते. त्यामुळेच कार्यकत्र्याच्या भावना उफाळुन आल्या आणि यातुन हा प्रकार घडला. याची मला प्रारंभी माहीती नव्हती परंतू  माहीती घेतल्यावर यामागचे कारण समोर आले. परंतू बॅनर प्रकरणी वरीष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.