शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चार तास शिजवल्यावरही तरी तांदूळ शिजला नाही, तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याच्या संशयाने अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:12 IST

ठाकूर्ली येथील चेाळे गावात राहणारे बाळा शेट्टी यांनी एका दुकानातून तांदूळ विकत घेतले. ते तांदूळ त्यांनी कुकरमध्ये चार तास शिजत ठेवून देखील ते शिजलेच नाही. त्यामुळे तांदूळ प्लॅस्टीकचे असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेट्टी यांनी अन्न व औधष प्रशासनाच्या ठाणो कार्यालयात तक्रार केली आहे.

 कल्याण - ठाकूर्ली येथील चेाळे गावात राहणारे बाळा शेट्टी यांनी एका दुकानातून तांदूळ विकत घेतले. ते तांदूळ त्यांनी कुकरमध्ये चार तास शिजत ठेवून देखील ते शिजलेच नाही. त्यामुळे तांदूळ प्लॅस्टीकचे असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेट्टी यांनी अन्न व औधष प्रशासनाच्या ठाणो कार्यालयात तक्रार केली आहे. अधिकारी वगाने तांदळाचा नमून घेण्यासाठी शेट्टी यांच्या घरी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न शिजलेले तांदूळ हे प्लॅस्टीकचे आहेत की नाही हे प्रयोग शाळेत तपासणी पश्चात स्पष्ट होणार आहे. 

शेट्टी यांनी काल एक किलो तांदूळ नेतिवली येथील अमित स्टोअरमधून विकत घेतले. तांदळाचे बिल त्यांनी दुकानदाराकडून घेतले. त्यांनी विकत घेतलेला तांदूळ हा ब्रॅण्डेड नसला तरी दुकानदाराने दिलेल्या बिलावर सूरती कोलम असा उल्लेख आहे. विकत घेतलेला तांदूळ त्यांच्या घरी आज देवीची पूजा होती. त्यानिमित्त त्यांना प्रसाद तयार करायचा होता. त्यांनी तांदूळ, तूप आणि गूळ घालून त्यात थोडे पाणी टाकले. तो कुकरमध्ये शिजत ठेवला. चार तास झाले तरी हा तांदूळ शिजत नसल्याची बाब उघड झाली. त्यांचे पूजारी शेट्टी यांच्यावर गरम झाले. प्रसाद तयार नसल्याने पूजाही पार पडली नाही. न शिजलेला तांदूळ हा प्लॅस्टीकचा असू शकतो असा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. न शिजलेल्या तांदळा प्रकरणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणो कार्यालयातील अधिका:यांशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा अधिका:यांनी ठाणो कार्यालयात येऊन तक्रार द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन तांदूळ घेऊन जाऊन. त्याची तपासणी करुन त्यानंतर तो तांदूळ प्लॅस्टीकचा आहे की नाही हे स्पष्ट होईल.  तत्पूर्वी तांदूळ पाण्यात टाकून पहा. तो पाण्याच्या तळाशी गेला तर तो तांदूळ नाही असे समजा असेही अधिका:यानी शेट्टी यांना सांगितले. त्या प्रकारे शेट्टी यांनी ते करुन पाहिले. तेव्हा तांदूळ पाण्याच्या तळाशी गेला. तांदूळ घरी ठेवा. त्याचे नमुने घेतले जातील असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून देण्यात आले आहे. यापूर्वी डोंबिवलीत प्लॅस्टीकची अंडी विकल्याची बाब समोर आली होती. मात्र तपासाअंती ती अंडी प्लॅस्टीकची नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे प्लॅस्टीकचे तांदूळ बाजारात विकले जात असल्याच्या बातम्या ऐकिवात असून प्लॅस्टीक तांदळाचा वापर चायनीज कॉर्नरमध्ये सर्रासपणो केला जातो असे ही सांगितले जाते. प्लॅस्टीक तांदळाच्या संशयाने कल्याणमध्ये खळबळ माजली आहे. संबंधित दुकानदाराकडे त्याची तक्रार का केली नाही असा सवाल शेट्टी यांच्याकडे उपस्थीत केला असता त्यांनी सांगितले की, तो अलर्ट होऊन त्याच्या दुकानातील प्लॅस्टीक तांदळाचा साठा रातोरात्र गायब करुन नामानिराळा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे तक्रार करणो उचित नाही.

टॅग्स :foodअन्न