शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीमुळे व्यवस्थापकाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:28 IST

विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे : विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. आरोप करणाऱ्या महिलेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा दावा करून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा आपल्या मालमत्तेचे वारसदार राहतील, असे त्याने यात स्पष्ट केले आहे.शर्माच्या आत्महत्येनंतर त्याच्या कोलशेत रोडवरील ‘लोढा अमारा’मधील पंचविसाव्या मजल्यावरील सदनिकेमध्ये पंचनामा करताना पोलिसांना चिठ्ठी मिळाल्याची माहिती एका अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. याच चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण त्याने स्पष्ट केले आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्यामुळे पुण्याला चांगली नोकरी मिळाली होती. ती नोकरी सोडून अलीकडेच वाशी येथील रिलायन्स कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी लागली. तिथेच या २६ वर्षीय कनिष्ठ सहकारी महिलेशी चांगली ओळख झाली. तिच्याशी झालेल्या मैत्रीतूनच तिच्याबद्दल पझेसिव्हनेस निर्माण झाला. पुढे मात्र तिने विनयभंगाचा आरोप केल्यामुळे अटक झाली. पोलीस कोठडीतही राहावे लागले. एका महिलेमुळे आईवडील, पत्नी आणि मुलाला फसवल्याची भावना आहे. विनयभंगाचा आरोप करणाºया सहकारी महिलेच्या नावाचा उल्लेख करून तिच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे या चिठ्ठीत त्याने म्हटले आहे. शेअर्स, बँकेतील गुंतवणूक आणि रोकड अशी सुमारे एक ते दीड कोटीची मालमत्ता ही पत्नी पौर्णिमा आणि मुलाला देण्यात यावी. यामध्ये सावत्र आई आणि वडिलांचा मात्र त्याने उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातील लॅपटॉपही जप्त केला असून या लॅपटॉपमध्येच त्याने संपत्तीचा तपशील दिल्याचेही या अधिकाºयाने सांगितले.नामांकित कंपनीमध्ये असताना महिलेकडून झालेला विनयभंगाचा आरोप, समाजात झालेली बदनामी, पोलीस कारवाई तसेच नोकरी जाण्याची भीती यातून व्यथित झाल्यामुळे जामिनावर सुटल्यानंतर घरी जातानाच त्याने आत्महत्येचा विचार केल्याची शक्यता आहे. पत्नीनेही त्याला जाब विचारून फैलावर घेतले. आईवडील, मेहुणी आणि पत्नी यांच्यासमोरच धावत घराबाहेर पडून लॉबीच्या खिडकीतून त्याने स्वत:ला झोकून दिले. हे अचानक घडल्याचे चित्र असले, तरी चिठ्ठीमुळे आत्महत्येचा विचार त्याने आधीच केल्याचे स्पष्ट झाल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.>विनयभंग प्रकरणात अबेटेड समरीशर्माने आपल्याच पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज पाठवल्यामुळे त्याला विनयभंग प्रकरणात अटक झाली. आता आरोपी मृत पावल्यामुळे न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना केवळ अबेटेड समरी दाखल करावी लागणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. शर्माविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्याचा (एडीआर) गुन्हा दाखल आहे. विनयभंगाच्या गुन्ह्याचा तपास मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ मार्फत करण्यात येत आहे. मोठ्या पदावर असल्यामुळे शर्माला सुमारे दीड ते पावणेदोन लाख इतके वेतन होते. त्याची पत्नीही चांगल्या पदावर नोकरीला आहे. एरव्ही, नवी मुंबईमध्ये वास्तव्याला असलेले त्याचे आईवडील मुलगा जामिनावर सुटल्यावर त्याची समजूत घालण्यासाठी ठाण्यातील घरी आले होते. त्याच्या आत्महत्येमुळे त्यांना धक्का बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.