शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अहवाल दिशाभूल करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:48 IST

आपल्या इंग्रजी शाळांमधून गेली १४ वर्षे बेकायदा वसूल केलेली फी एका महिन्यात परत

ठाणे : आपल्या इंग्रजी शाळांमधून गेली १४ वर्षे बेकायदा वसूल केलेली फी एका महिन्यात परत देण्याची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने अद्याप ती दिलेली नाहीच. मात्र, ज्या वर्षापासून ती वसूल केली, त्या वर्षापासून ती परत न करता २०१२ पासून विद्यार्थ्यांना परत देण्यासंदर्भातला अहवाल शासनाला पाठवला आहे.२००३ पासून ती देणे बंधनकारक असताना २०१२ पासून ती देण्यासंदर्भातील पाठवलेला अहवाल शासनाची दिशाभूल करणारा असल्याचा आक्षेप मूलभूत शिक्षण हक्क समितीने घेतला आहे. याविरोधात शासनाला एक पत्र पाठवून त्यांच्या उत्तरानंतर पुढची कायदेशीर प्रक्रि या केली जाणार असल्याची माहिती या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे घनश्याम सोनार यांनी दिली.फी देण्यासंदर्भात महासभेत ठरावदेखील झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे तब्बल सव्वा कोटीची रक्कम सुमारे ६०० विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने मात्र वसूल केलेली फी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी झालेला पालकांचा खर्च अशी मिळून ही रक्कम जवळपास दोन कोटींपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे.महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधून गेली १४ वर्षे बेकायदेशीरपणे ती शिक्षण विभागाने वसूल केली असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने ही माहिती उघड केली असून या बेकायदा वसुलीविरोधात थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्र पाठवून दाद मागितली आहे.दरम्यान, मनपाने स्वत:ची बाजू लपवण्यासाठी चलाखीने समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीचे नाव पुढे करून इंग्रजी शाळेतील बेकायदा घेतलेली फी समितीनेच २०१२ ते २०१७ पर्यंत परत मागितली, असा जो शासनाला अहवाल दिला आहे, तो तद्दन खोटा असल्याचे सोनार यांचे म्हणणे आहे. बालकांची एकूण १४ वर्षांची फी परत देणे बंधनकारक आहे. दरम्यान, उपायुक्त मनीष जोशी यांनी हा कायदा अस्तित्त्वात आल्या दिवसापासूनची फी परत करणार असल्याचे सांगितले.