शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरेगाव-भीमा’चा अहवाल महिनाभरात सरकारकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:04 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणात ३ जानेवारीला पुकारलेल्या बंद आंदोलनादरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्याने सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण : कोरेगाव-भीमा प्रकरणात ३ जानेवारीला पुकारलेल्या बंद आंदोलनादरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्याने सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल एका महिन्यात राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी दिली.कोरेगाव-भीमा प्रकरणात बंद पुकारण्यात आला. त्याचे पडसाद कल्याण, वढू, कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, नाशिक आणि नगर येथे जास्त प्रमाणात उमटले. दलित आणि सवर्ण यांच्यात संघर्ष झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दलितांच्या तक्रारींवरून सवर्णांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत, तर सवर्णांच्या तक्रारीवरून दलितांविरोधात प्राणघातक हल्ला कलम ३०७ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. परंतु, पोलिसांची भूमिका यात संशयास्पद आहे.सवर्ण आणि दलित समाजाकडून सरकारकडे याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगास प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे, पीडितांशी बोलणे, त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणे जाणून घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करावा, असे आदेश दिले आहेत.त्यानुसार, आयोगाचे सदस्य सी.एल. थूल व एम.बी. गायकवाड यांनी सोमवारी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा व सिद्धार्थनगरात पहिली भेट दिली. तेथे लोकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर, कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात सवर्ण व दलित समाजांतील लोकप्रतिनिधी व पीडितांचे म्हणणे जाणून घेतले. या आंदोलनप्रकरणी विद्यार्थी, एमसीएससीचे परीक्षार्थी, सरकारी व निमसरकारी सेवेतील नोकरदारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. विद्यार्थ्यांचे करिअर संपुष्टात येऊ शकते. त्याची शहानिशा करून जे या प्रकरणात दोषी नाहीत, त्यांच्यावर अन्याय होऊ नयेत, त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळावीत, या सर्व बाबी आयोग जाणून घेणार आहे.कल्याणमध्ये या घटनेचा उद्रेक जास्त प्रमाणात झाला. सवर्ण आणि दलित समाजावर अन्याय होऊ नये, असा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, असे थूल यांनी स्पष्ट केले.>पहिली भेट कल्याणला, अन्य ठिकाणचीही परिस्थिती जाणून घेणारअनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल व एम.बी. गायकवाड यांनी पहिली भेट सोमवारी कल्याणला दिली. त्यानंतर ते वढू, कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, नाशिक आणि नगरला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेणार आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे, घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, सीसी टीव्ही फुटेज हा सगळा दस्तऐवजही पाहिला जाणार आहे. पोलिसांकडून त्यांना तो सादर करणार आहेत. लोकांच्या भेटी, प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट हे सगळे पाहून सविस्तर व वस्तुस्थितीदर्शक अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव