शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा वेध डायघर प्रकल्पाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:44 IST

कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील

ठाणे : कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने पुन्हा एकदा पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या नागरिकांच्या विरोधामुळे गेली १२ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. याठिकाणी वृक्ष लागवड सुरु असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु होईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे शहरात आजच्या घडीला सुमारे ७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. पालिका स्थापन झाल्यापासून, डम्पींगचा प्रश्न सुटलेला नाही. सुमारे १२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने शास्त्रोक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु स्थानिकांचा विरोध झाल्याने पालिकेला हा प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मग कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे इस्टेट असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे. शीळफाटा येथील वन विभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात येत असून या जागेवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.या ठिकाणी १०० मेट्रीक टन कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. परंतु या सर्वांवर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भराव भूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते. परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरुन पालिकेने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने पालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु आता ही योजनात बारगळल्याने कचरा कुठे टाकायचा, असा पेच पालिकेसमोर उभा राहिला आहे.दरम्यान सध्या पालिकेकमार्फत शहरात निर्माण होणाºया विविध प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण करुन प्लास्टीक वेस्ट, वुड वेस्ट, डेब्रीज वेस्ट आदींसह इतर छोटेखानी प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. तसेच, १०० मेट्रीक टन कचºयावर काही सोसायटींच्या माध्यमातून प्रक्रिया सुरु झाली आहे.