शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०७ ब्लॅक स्पॉट्सची होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:00 IST

१०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ची अधिकाऱ्यांच्या समितीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत गुरुवारी दिले.

ठाणे : जिल्ह्यातील सर्व शहरे, ग्रामीण भागात, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मार्गांवरील १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ची अधिकाऱ्यांच्या समितीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत गुरुवारी दिले. यासाठी दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना तातडीने समितीकडे नोंदवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुभाजक तोडणाºया पेट्रोलपंपचालक आणि हॉटेलचालकांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले.लोकमतने या अपघातस्थळांकडे सतत प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘माळशेजसह भिवंडी बायपासवरही ब्लॅक स्पॉट्स’ या मथळ्याखाली लोकमतने २७ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी बैठक घेऊन संबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देऊन समितीदेखील गठीत केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी रस्तासुरक्षेच्या विषयाचा आढावा सर्वोच्च न्यायालयापुढे जात असल्याने अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने अपघात कमी कसे होतील, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.>हे आहेत ब्लॅक स्पॉट्सयावेळी समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बोलताना स्पष्ट केले की, ठाणे शहर परिसरात राष्ट्रीय महामार्गांवर १८ आणि राज्य महामार्गांवर १२, इतर मार्गांवर २९ असे ५९ ‘ब्लॅक स्पॉट्स’ असून ठाणे ग्रामीण भागात राष्ट्रीय महामार्गांवर २७, राज्य महामार्गांवर ११ आदी ३८ अपघातस्थळे असल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबई भागात १० आणि मुंबई-अहमदाबाद या द्रुतगती महामार्गावर एक अशा १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’वर या बैठकीत संबंधित अधिकाºयांसमक्ष चर्चा करण्यात आली.>ही होणार कामेरस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजनांचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागांशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य आणि जिल्ह्यांतील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवरआवश्यक ती दुरु स्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्र ॉसिंग पट्टे रंगवणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रु ग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडिट आदी कामे सातत्याने करण्याचे या बैठकीत निश्चित झाले.>दुभाजक तोडणाºया पेट्रोलपंप, हॉटेलचालकांवर कारवाईशहापूर ते पुढे कसाºयापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक काही ठिकाणी तोडण्यावर या बैठकीत चर्चा झाली. मार्गालगतचे पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल तसेच गावकºयांनी आपापल्या सोयीसाठी ते तोडून येजा करण्यासाठी वाट केली आहे. याशिवाय, शहापूर ते पडघा मार्गालगत ग्रामपंचायतीकडून कचरा व डेब्रिज टाकले जाते. त्याला आग लावल्यामुळेही धूर होतो आणि दृश्यमानता कमी होते. याची दखल घेऊन पोलिसांनी संबंधितांवर त्वरित कारवाई केली पाहिजे, असे सांगण्यात आले.