शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर समतानगर नाल्याच्या पुलाची दुरुस्ती करा, अन्यथा परिसर होणार जलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:25 IST

गेल्या वर्षी कुर्ला कॅम्प समतानगर रस्त्यावरील खचलेल्या नाल्याचा पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास नाला तुंबून परिसर जलमय होणार असल्याची भीती स्वछता निरीक्षकानें व्यक्त केली.

सदानंद नाईक उल्हासनगर : गेल्या वर्षी कुर्ला कॅम्प समतानगर रस्त्यावरील खचलेल्या नाल्याचा पुलाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास नाला तुंबून परिसर जलमय होणार असल्याची भीती स्वछता निरीक्षकानें व्यक्त केली. महापालिका बांधकाम विभाग, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, महापौर आदींना स्वच्छता निरीक्षकानें पत्र दिल्याने, महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.उल्हासनगर पूर्वेतील कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी रस्त्यावरील समतानगर येथे मुख्य रस्त्याचा पूल व सरंक्षण कठडा गेल्या पावसाळ्यात खचला. याप्रकाराने एकच खळबळ उडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नगरसेवकांनी लावून धरली. दरम्यान महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली. तसेच लवकरच पुलाची दुरुस्ती केली जाईल. असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दुसरा पावसाळा तोंडावर आल्यावरही पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. ऐन पावसाळ्यात नाल्यावरील पूल खचल्यास पावसाचे पाणी तुंबून रवींद्रनागर, समतानागर, साईनाथ कॉलनी, तानाजी नगर, वडारपाडा परिसर जलमय होण्याची भीती चक्क महापालिकेच्या स्थानिक स्वच्छता निरीक्षकाने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या आयुक्त पदी डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली तेंव्हा पासून, महापालिका कारभारात सावळागोंधळ उडाल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. गेल्या एका वर्षांपासून कुर्ला कॅम्प समतानगर मुख्य रस्त्यावरील खचलेल्या पुलाची दुरुस्ती न झाल्याने, आयुक्तांच्या कारभारावर टीकेची झोळ उठली. तोंडावर आलेल्या पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती न झाल्यास, नाल्याचे पाणी तुंबून परिसर जलमय होण्याची भीती महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक व्यक्त करीत आहे. तसे झाल्यास शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. महापालिका आयुक्तांनी भविष्यातील वित्त व जीवितहानी लक्षात घेऊन, पुलाची दुरुस्ती करा. अशी मागणी वेळोवेळी केल्याची माहिती काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. तसेच नगरसेविका मीना सोंडे, अंजली साळवे, कविता बागुल, नगरसेवक प्रमोद टाले, राजेश वानखडे आदींनीही यापूर्वीच पुलाच्या दुरुस्तीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली.तानाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर येथील पूल खचल्याने, पावसाळ्यात पाणी तुंबून रवींद्रनगर, तानाजीनगर, वडारपाडा, साईनाथ कॉलनी आदी परिसर जलमय होण्याची भीती स्वच्छता निरीक्षकानें व्यक्त केली. याप्रकाराने पावसाळ्या पूर्वीच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे