शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील डम्पिंग हटवा, काँग्रेसचा उपोषणाचा इशारा, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By सदानंद नाईक | Updated: July 9, 2024 18:02 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाची संपली आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर : हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेले खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठीं काँग्रेस पक्ष महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी बुधवार पासून उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाची संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला उन्हाळा व हिवाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात डम्पिंगची दुर्गंधी पसरते. डम्पिंग परिसरातील शेकडो नागरिकांना खाज, त्वचा रोग, दमा, टीबी आदी रोगाची लागण झाल्याची माहिती स्थानिक नागरिक देत असून २४ तास उघडा राहणाऱ्या रुग्णालयाची मागणी स्थानिकांची आहे. तसेच डम्पिंगसाठी शासनाने पर्यायी जागा दिल्याने, त्याजागी डम्पिंग हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे लावून धरली. त्यासाठी रस्ता रोखो, उपोषण, धरणे आंदोलन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली. आतातर डम्पिंगची काय स्थिती आहे, ते कुठे व केंव्हा हटविणार याबाबत महापालिका प्रशासन काहीएक बोलत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

 हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत काहीएक निर्णय महापालिका घेत नसल्याने, अखेर रोहित साळवे यांनी बुधवारी नेताजी चौकात सहकाऱ्यांसह उपोषणाचा इशारा दिला. डम्पिंग हटविण्याची प्रक्रिया सुरू करणे, ज्याठिकाणी डम्पिंग हटविले जाणार. तेथिल परिस्थिती काय? पावसाळ्यात डम्पिंग मधून प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर काही उपाययोजना केली का? असा प्रश्न साळवे यांनी केला. तसेच प्रसिद्ध शिवमंदिर, सिंधी समाजाचे चालिया मंदिर डम्पिंग ग्राऊंड पासून अवघे १ की.मी. परिसरात येत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर