शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणात पुन्हा रमूया...... विसरलेले खेळ पुन्हा खेळूया, गृहिणी माताभगिनींचा उत्स्फुर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:50 IST

प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांच्या हास्ययोग, कॉफी आणि बरेच काही ( गप्पांचा कार्यक्रम ) मला भावलेल्या कविता, वरिष्ठ नागरिकांसाठी स्मृतीआड गेलेल्या खेळांची उजळणी, उन्हाळीशिबीरला सगळ्यांनीच भरगोस प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देलहानपणात पुन्हा रमूया...... विसरलेले खेळ पुन्हा खेळूयागृहिणी माताभगिनींचा उत्स्फुर्त सहभागसगळ्यांची मन भुर्रकन पुन्हा आणखीन काही वर्षे मागेगेले

 

ठाणे : ठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिवेने मे महिन्यात प्रौढांसाठी आणि मुला-मुलींसाठी बरेच कार्यक्रम केले. शनिवारी त्यांनी मातृदिनाचे औचित्य साधून महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला आगळा वेगळा विनाशुल्क कार्यक्रम चला ! लहानपणात पुन्हा रमूया...... विसरलेले खेळ पुन्हा खेळूया हा कार्यक्रम नानानानी पार्क गावंडबाग ठाणे येथे दिमाखात पार पडला.         दररोजच्या रगाड्यात  अडकलेल्या महिला मातांना एकदिवस आपल्या लहानपणीच्या खेळांच्या दुनियेत रमता यावे आणिविस्मृतीतगेलेल्याखेळांचीउजळणीव्हावीह्याहेतूनेप्राडॉसुनीलकर्वेयांनी हा कार्यक्रमाची संकल्पना आखली होती. गेल्या तीन वर्षांपासून मुला-मुलींसाठी असा उपक्रम प्रा. डॉ. सुनील कर्वे राबवत आहेत. पण यंदा प्रथमच महिलांसाठी ठाण्यात अश्या प्रकारचं हा पहिलाच उपक्रम राबवला. मातृदिन होता 12 मे रोजी पण सगळ्यांच्या सोयींनी आज चवथा शनिवार सुट्टी म्हणून अशा आगळ्यावेगळ्या पद्धतींनी मातृदिन साजरा होतोय. शनिवार मुद्दामून निवडला कारण घर संभाळायची जबाबदारी प्रत्येकानी नवर्‍याकडे दिली आणि बिन्धास सगळ्या भगिनी जमा झाल्या.  खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा असतो ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवणते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हल केच गोंजारण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. सुनील कर्वे केले होते. ठरल्याप्रमाणे सगळ्या महिला 10 वाजता जमा झाल्या. उत्सुकता शिगेला पोचली होती. प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी सगळ्या महिला-मातांचे हार्दिक स्वागत केले आणि वॉर्मिंग अप सुरु झाले आणि कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता सगळ्याजणी बिन्धास खेळायला लागल्या. ह्या खेळाच्या कार्यक्रमात आपडीथापडी , शिवाजी म्हणतो , वाघोबा किती वाजले, दगड का माती, फुगडी, ठिक्कर,  काचपाणी, विषामृत, आंधळी कोशिंबीर, खाम खाम खांबोली , कानगोष्टी, आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं, कांदाफोडी, टिपी टिपी टॉप टॉप, चिमणी भुर्रर्र - कावळा भुर्रर्र, तळ्यातमळ्यात, उभाखो-खो, संत्रालिंबू, रुमालपाणी अशा प्रकारच्या अनेक जुन्या खेळांना प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनीउजाळा दिला उपस्थितांना हे खेळ समजावून देऊन त्याचे प्रात्यक्षिकही दाखवली मग उपस्तित महिलानांनी ते मनोसोक्त खेळले. ह्या कार्यक्रमातून मनोरंजनाबरोबर उपस्थित महिला-पालकांना सुद्धा एक महत्वाचा संदेश प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी दिला ते म्हणाले कि तुमच्या मुला-मुलींना असे पारंपरिक खेळ शिकवा त्यांना खेळायला लावा. त्यामुळे त्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास सुलभ होईल व ते पण काही दुष्परिणाम न होता व तसेच काही खर्च न होता.             प्रा. डॉ. सुनील कर्वे पुढे आपले निरीक्षण सांगताना म्हणाले किहल्ली बरेचसे  पालक आपल्या पाल्याने बाहेर कुठे खेळायला जाऊ नये आणि घरातच बसून काय ते खेळावे म्हणून त्याला घरात खेळता येतील असे खेळ आणून देतात. त्यातच भर मोबाइलमधील गेम्स. मुल बाहेर खेळायला गेली तर त्याला लागेल,   मातीत हात खराब होतील वगैरे वगैरे.  त्यातूनही एखादा पालक जर मातीत खेळायला सोडत असेल तर त्याला ढीगभर नियम असतात. चपलाच घालून जा, जास्तवेळ मातीत खेळू नकोस, आल्यावर हात पाय साबणाने धुवा... अशी यादी चालूच राहते. मुलं  विचार  करत असतील कि इतके नियम पाळण्यपेक्षा मातीत न खेळलेलं बर. म्हणजे काळजी, नुसतीच काळजी म्हण्यापेक्षा पालकांची अति काळजी मारक ठरते आहे. सध्याच्या मुलांना पालक कोणत्या न कोणत्यातरी शिकवणीमध्ये सारखच गुंतवून ठेवतात. त्यामुळे त्यांना असे पारंपरिक खेळ खेळाला वेळच मिळत नाही त्यामुळे अशा खेळांकडे गेल्या15 वर्षात दुर्लक्ष झाले आहे अशी खंत प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी व्यक्त केली. आताची पिढी असे खेळ काही काळानंतर केवळ शब्दकोशामधेच वाचेल अशी भीती मला वाटायला लागली म्हणून ह्या सगळ्या माताभगिनींनाएकत्रकेलेआणित्यांच्यावर जबादादरी पण टाकली आहे कि घरी जाऊन तुमच मुलंमुलींना तसेच सोसायटीमधील सगळ्यांना हे विसरलेले काळाच्या आडगेलेले खेळ तुम्ही शिकवा.               तुमच्या आईबाबांनी सगळे खेळ खेळू दिले त्यांनि तुम्हाला बांधून ठेवले नाही ना ? असा प्रश्न उपस्थितांना प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी विचारला. मात्र आजच्या बालगोपाळांच्या पिढीच्या नशिबी हे खेळ कसे येणार म्हणून हा खटाटोप. प्रत्यक्ष  पालकांनी मुलांबरोबर लहान होऊन हे खेळ खेळणे जरुरी आहे.  प्रा. डॉ. सुनील कर्वे  ह्यांनी महिलांना  सांगितले कि तुम्ही सोसायटीमध्ये एकत्र जमता, किटीपार्टी करता तेव्हा ह्यातील काही खेळ जरूर खेळा त्यामुळे अशा खेळांना पुनर्जीवन मिळेल. हल्ली आपण पाहतो विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कौटुंबिक दरी वाढते आहे कलह स्ट्रेस टेंशन वाढत आहे ह्यावर रामबाण उपाय म्हणजे असेखेळ घरी कुटुंबासमवेत पणखेळा असा सल्लाहि प्रा. डॉ.  सुनील कर्वे महिलांना द्यायला विसरले नाहीतशेवटी प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी वपुंच्या वपूर्झामधील ओळी वाचल्या अन् सगळ्यांची मन भुर्रकन पुन्हा आणखीन काही वर्षे मागे गेले आणि सारंसारं बालपण उपस्थितांना पुन्हा आठवलं.  लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला? भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला... कशाला आलं हे आपल्याला शहाणपण ???? हरवलं त्यात ते सुंदर बालपण             शेवटी वेळ अपुरा पडला. सगल्या सहभागी भगिनी खूप खुश होत्या आणि नॉस्टॅल्जिक झाल्या उपस्थित महिलांना निखळ आनंद, कुठेही इजा न होता मिळाला तसेच शारीरिक व्यायाम झाला. मनमुराद आनंद लुटला. लहान होणे या वयात जरुरी आहे असे जाणवले. त्यांनी प्रचंड मज्जा केली आणि मग परत कधी यायचे हा प्रश्न विचारून गोड आठवणीबरोबर घेऊन गेले.पणसगळ्याजणींनी जाताना प्रा. डॉ. सुनील कर्वे यांचे ह्या उपक्रमाबद्दल आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक