शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

...आणि एकनाथ शिंदे भावूक झाले! दुःखद प्रसंगाचे झाले स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:53 IST

आनंद दिघे हे दैवी महापुरुष म्हणून पाहतो, बाळासाहेबांनी आर्शिवाद दिले, दिघेंनी पुन्हा प्रवाहात आणले.

ठाणे  : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुख असतात, माझ्याही आयुष्यात तसेच क्षण आले. मात्र दुखाचे क्षण हे न विसरण्यासारखे आहेत.  या दुखात माझे संपूर्ण कुटुंब कोलॅप्स झाले होते. त्यातून बाहेर पडणो मला कठीण झाले होते. त्यात परिवार होताच असे सांगत राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाले. मात्र या दुखातून बाहेर काढण्याचे काम, धीर देण्याचे काम, पुन्हा उभे राहण्याचे काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केले असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.डॉ. काशिनाथ घाणोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ या ध्वनीचित्रफीतीच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, विविध महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रधान सचिव, एमएसआरडीसीचे अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आदींसह सिनेअभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मार्तोडकर आदींसह मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकार उपस्थित होते. आनंद दिघे हे दैवी महापुरुष म्हणून पाहतो, बाळासाहेबांनी आर्शिवाद दिले, दिघेंनी पुन्हा प्रवाहात आणले. एकनाथ तुला बाहेर पडायचे आहे. तुझे कुटुंब मोठे आहे, लोकांसाठी जगायचे आहे. राबायचे आहे, त्यामुळे त्यांच्या शब्दांच्या ताकदीपुढे आपण काय बोलणार असे सांगत त्यांनी आपण राजकारणात कसे उभे राहिलो हे विषद केले. कोरोनाची पहिला लाट, दुसरी लाट अतिशय भयानक होती, ऑक्सीजनचा पुरवठा कमी होत होता. परंतु त्यातून आता कुठेतरी आपण बाहरे पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे एवढय़ा कौतुकाची सवय नाही, कौतुक पचनी पडत नाही, परंतु कौतुक केलेले आवडते, परंतु फक्त मला कधी अडचणीचे होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे शहरात लागलेल्या त्या फलकाच्या निमित्ताने बोलतांना कोण कुठे फलक लावतो, मी काय बघत बसू का, अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. सर्व पहायला लागते, खबरदारी घ्यावी लागते, विकासप्रकल्प राबवित असतांनाही प्रशासनाबरोबर संवाद साधत खबरदारी घ्यावी लागते. तसेच जेव्हा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणो उभे असते, तेव्हाच तुम्ही चांगले काम करु शकता, असेही त्यांनी सांगितले. आपण घेतलेल्या निर्णयांचा सर्वसामान्यांना कसा फायदा याचा विचार आधी केला पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. मी कमी बोलतो जास्त ऐकतो, त्यामुळे अडचणी कमी निर्माण होतात, त्यातही ऐकल्यानंतर त्या विषयाची ग्रीप आपल्याला समजते. युनीफाईडीपीसीआर बाबत निर्णय घेतले. शिवाय राज्याचे दृष्टीने इतर कसे महत्वाचे निर्णय घेतले याची माहिती त्यांनी दिली. आपण जो र्पयत फिल्डवर उतरुन काम करीत नाही. तोर्पयत काम लवकर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रश्न अनेक वर्षानंतर आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुपात आला आहे. क्लस्टर अंतिम टप्यात आले आहे, सिडकोचे अनुभव यात आता कामी येणार आहे, सिडको केवळ घरे बांधणार नसून एक सुनियोजीत शहर उभे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे