शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या कवितेत धून असल्याने त्या लक्षात राहत- अरूण मैड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:20 IST

कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले. 

डोंबिवली : कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.     पु.ल. कट्टा यांच्यातर्फे पाऊसधून या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाऊस कविता सादर करण्यासाठी आवाहान केले होते. त्याला कवींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सुधाकर वसईकर,सीमा झुंझारराव, सुशांत भालेराव, हिमनील बोरसे, महेश देशपांडे, विजय जाधव, विजय पंडित, गिरीष लटके, स्वाती गोडबोले-दामले, वासुदेव सांबरे, लक्ष्मीकांत धुमाळ, अथर्व खांडगे, विष्णु खांजोडे आदी कवींनी सभागृहातील प्रेक्षकांना पावसाच्या भाव विश्वात नेले. प्रत्येक क वीचा आणि कवियत्रीचा पाऊस वेगळा होता. कुणाचा पाऊस प्रेमाला साद घालणारा तर कुणाचा पाऊस आजर्व करणारा होता. कुणाचा पाऊस अवखळ, नाठाळ होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश आव्हाड होते. तसेच कट्टयाचे संयोजक अजरुन डोमाडे, सारिका घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.     मैड म्हणाले, ग्रेस खरंतर कुणाला कळलेच नाही असे सांगून त्यांच्या कवितेत गूढता आहे ती जाणवते पण कळत नाही. तिचे वेगवेगळे अर्थ निघतात. शांताबाई शेळके यांची ‘वादळ वार सुटलं गं’ ही कविता म्हणजे कवितेला कशी लय असावी, धून असते याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या काळात कविता मुक्तछंदात लिहीली जाऊ लागली. त्यात दलित कवितेने जोश भरला आणि कवितेचं रूपचं पालटून टाकलं. मात्र पूर्वीच्या कविता लक्षात राहत असत. आताच्या कविता लक्षात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.     कवी गिरीष लटके यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजय पंडित यांनी हिंदी आणि उर्दू कविता उत्कटतेने सादर क रून प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल डोमाडे यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली