शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

Remdesivir Injection : मीरा भाईंदर महापालिकेकडील रेमडेसिविरचा साठा संपला; रुग्णांच्या नातलगांची वणवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 07:43 IST

Remdesivir Injection : महापालिकेने पुरवठादार कंपन्यांकडे ६ हजार इंजेक्शनची मागणी केली होती. परंतु इंजेक्शनचा पुरवठा अजूनही पालिकेला झालेला नाही. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपला आहे. त्यामुळे सदर इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या पालिका कोविड उपचार केंद्रात दाखल तसेच शहरातील अन्य रुग्णांच्या नातलगांची सदर इंजेक्शनसाठी वणवण सुरु आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढल्याने कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. जेणे करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे . एका रुग्णास किमान ६ इंजेक्शन द्यावी लागतात. परंतु सदर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातलगांची वणवण सुरु असून मागेल त्या दराने इंजेक्शन आणावे लागत आहे . अनेक ठिकाणी संपर्क करून व प्रत्यक्ष धावपळ करून सुद्धा इंजेक्शन मिळणे अवघड झाले आहे. समाज माध्यमांमध्ये सुद्धा इंजेक्शन मिळण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यातच मीरा भाईंदर महापालिके कडे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपला आहे . चालू महिन्यात पालिकेला केवळ ४०० इंजेक्शनच मिळाली आहेत . तर शासना कडून ५०० इंजेक्शन आली आहेत . महापालिकेने पुरवठादार कंपन्यांकडे ६ हजार इंजेक्शनची मागणी केली होती. परंतु इंजेक्शनचा पुरवठा अजूनही पालिकेला झालेला नाही. खाजगी रुग्णालयांकडे इंजेक्शन असल्याचे वितरक सांगत असले तरी रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल रुग्णांसाठी इंजेक्शन ठेवली असल्याचे सांगितले जाते . त्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने इंजेक्शनची मागणी वाढली आहे . इंजेक्शनचा साठा लवकर झाला नाही तर उपचारात मोठी अडचण होऊन रुग्णांचे मृत्यू होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस