शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्याची मागणी; उल्हासनगरवासीयांची थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:10 IST

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रेमडिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करीत, राज्याला लवकरच साडे लाख रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी व मर्यादित पुरवठ्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असून त्याला आळा घालण्याची मागणी उल्हासनगरवासीयांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

शहरातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे, महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयाचीं रेमडीसीविर इंजेक्शनची एकून मागणी महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मान्यताप्राप्त मेडिकलच्या माध्यमातून कोविड रुग्णांलयांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार असे ठरले. तसेच रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना चिट्टी देऊन इंजेक्शन मागणीला मनाई केली. असे असतांना सर्वच कोविड रुग्णांलय रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन सर्रासपणे हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहेत. मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, कायद्याने वागा लोकचवळीचे अध्यक्ष राज असोडकर, प्रहार जनशक्तिचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अंँड.स्वप्निल पाटील, समासेवक शिवाजी रगडे आदींनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करीत, राज्याला लवकरच साडे लाख रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. सध्या ब्लड प्लाझमा हा कोविड रुग्ण बरे होण्यासाठी संजीवणी ठरत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाला प्लाझमा आणण्यास सांगत आहेत. यातून प्लाझमा डोनर भेटणे हे देखील अवघड होऊन बसल्याची माहिती उल्हासनगर वासीयांची शिष्टमंडळाने दिली. शासनाने शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना प्लाझमा दान करण्याकरीता शासनाकडून जनजागृती करावी. अशी सूचना यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस