शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स-शेतकऱ्यांमधील संघर्ष,महिलेची विनयभंगाची लेखी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:54 IST

भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला.

वज्रेश्वरी: भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला. येथील शेतकºयांचे मोबाइल जप्त करून त्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवून काम करण्यास सुरु वात केली. दरम्यान, महिलेने रिलायन्सच्या अधिकाºयाविरोधात विनयभंगाची तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात केली आहे.मागील आठवड्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शेतक-यांनी आपल्यावरील अन्यायाची कल्पना दिली होती. त्यावर त्यांनी या शेतकºयांना आश्वासन दिले होते. मात्र रिलायन्सने पोलीस बळाचा वापर करत शेतकरी व महिलांना धक्काबुक्की केली. त्यांना पालखणे पोलीस चौकीत डांबून ठेवले. दरम्यान, या प्रकारामुळे हर्षला पाटील यांचा रक्तदाब वाढल्याने त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या.रिलायन्सचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात काम करायला आले असता, आमचा पूर्ण मोबदला देऊन नंतर काम करा अशी मागणी करणा-या शेतक-यांना दमदाटी करत एका अधिका-याने महिलेचा विनयभंग केला यासंदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करायला गेले असता पोलिसांनी महिलेला रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवत गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेने लेखी तक्रार दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे