शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

ठाण्यात पक्षिमित्रांच्या मदतीने कावळयांच्या तावडीतून घुबडांच्या पिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:58 PM

ठाण्यातील वसंतविहार परिसरातील इडन वुड कॉम्पलेक्समध्ये गव्हाणी जातीतील घुबडांच्या कोवळया पिलांना कावळयांनी जखमी केले होते. या कावळयांच्या तावडीतून दोन्ही पिलांची पक्षिमित्रांनी सुटका केली.

ठळक मुद्देइडन वुड कॉम्पलेक्समध्ये आढळली दोन पिलेपराग शिंदे या पक्षिमित्राने केले रुग्णालयात दाखलदोन्ही पिलांना मिळाले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अवघ्या दहा ते १५ दिवसांच्या गव्हाणी घुबडांच्या कोवळया पिलांना वसंतविहार परिसरातील इडन वुड कॉम्पलेक्समध्ये जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यांच्यावर ते आणखीही हल्ला करण्याच्या बेतात असतांनाच पराग शिंदे या प्राणी मित्राने त्यांची या कावळयांच्या तावडीतून सुटका केली.गव्हाणी जातीच्या दोन घुबडांच्या पिलांना कावळयांनी टोचा मारुन जखमी केले होते. स्थानिक रहिवाशी रमेश यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पक्षीमित्र पराग शिंदे यांना ही माहिती दिली. शिंदे यांनी या दोन्ही पिल्लांना आस्थेने जवळ घेऊन त्यांना ब्रह्मांड येथील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही पिल्लांची कावळयांच्या तावडीतून रमेश आणि पराग यांनी मदतीचा हात दिल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले आहे.ठाण्यात गव्हाणी, पिंगळा, ईगल आणि स्कोप अशा चार जातींची घुबडे आढळतात . ठाण्यात गव्हाणी आणि पिंगळा या दोन जातीची घुबडे नियमितपणे आढळत असल्याचे शिंदे सांगितले. या जातीच्या घुबडांचा आवाजही कर्कश असून रात्री अनेकदा घुबडांच्या कर्कश आवाजाच्या तक्र ारी नागरिकांकडून येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या दोन्ही पिलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना उपचार करुन सोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग