शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:12 IST

थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.

मीरा रोड : थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. या व्यापाºयाची तब्बल नऊ दिवसांनी सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.भार्इंदर पश्चिमेस दीडशे फूट मार्गावरील श्रीसाई टॉवरमध्ये जितेंद्र रामेश्वर जोशी (३२) हे कापड व्यापारी राहतात. ते भिवंडीतील कापड व्यापारी गजानन राघू हरड (३२, रा. सोनाळे) यांच्याकडून जीन्स पॅन्टची खरेदी करत. गेल्या आठ महिन्यांपासूनचे मालाचे ११ लाख रुपये जितेंद्र देत नव्हता. तो पैसे देत नसल्याने दोघांत वाद होत होते.आई व भाऊ जोधपूरला जाणार म्हणून बोरिवलीला त्यांना टॅक्सीने पाठवण्यासाठी टॅक्सी आणण्यासाठी २९ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास जितेंद्र घरातून उतरून खाली गेले होते. तेव्हा झायलो गाडीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी जितेंद्र याला मारहाण करत बळजबरीने गाडीत टाकून त्यांचे अपहरण केले.या प्रकरणी जितेंद्रच्या आईने भार्इंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या अपहरण प्रकरणी तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे, अभिजीत टेलर यांच्यासह वेळे, वाडिले, ढेमरे, जाधव, पोशिरकर, पंडित, गर्जे, थापा, श्रीवास्तव आदींचे विशेष पथक नियुक्त केले होते.या पथकाच्या तपासात जितेंद्रचे अपहरण भिवंडीच्या हरड याने घडवून आणल्याचे समोर आले. मधल्या काळात जितेंद्रचा आईला फोन आला होता व आपण सुखरुप असल्याचे त्याने सांगितले होते. त्याचे अपहरण पैशांच्या थकबाकीवरुन झाल्याची खात्री पोलीस पथकाला पटल्याने त्यांनी कसून तपास सुरु केला. त्यातच जितेंद्रच्या जवळ राहणारा वरुण दिलीप अग्रवाल (३२, रा. रेनुजा रामदेव, दीडशे फुट मार्ग, भार्इंदर) याने अपहरणकर्त्यांना आवश्यक माहिती पुरवल्याचे समोर आले.जितेंद्र याला सोनाळे गावातील एका बंद गोदामात कोंडून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून अपहरणकर्त्यांना अटक केली आणि त्याची सुटका केली.गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी गजानन हरड व वरुण अग्रवालसह रमेश उर्फ अनिल यादव (३८, रा. सोनाळे), अवधुत सुनील शेलार (२७), मयुरेश सुनील म्हात्रे (२८), यतीन महादेव देसाई (२८), प्रथमेश हरिश्चंद्र वालावलकर (२७, सर्व रा. लोढा हेरिटेज, डोंबिवली पूर्व) यांना अटक केली. हरडचा भाचा दिप्तेश नाईक (रा. लोढा हेरिटेज, डोंबिवली) हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrimeगुन्हाArrestअटक