शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:42 IST

दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले

ठाणे : दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले असतांनाच आता कोपरीतील प्रस्तावित रात्र निवा-यालाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दुले नकोत असे सांगून तेथील नगरसेवकांनी नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सध्या सुरू केलेल्या रात्र निवाºयांचे कामही अर्धवट राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नौपाड्यातही स्थानिकांनी याला विरोध केला होता.सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु, दिलेल्या निर्धारीत वेळेत ठाणे महापालिकेला ते उभारण्यात यश आलेले नाही.केंद्र सरकारचे दोन कोटी अनुदान आणि पालिकेचे ९४ लाखांंच्या निधीतून कोपरी येथे रात्र निवारा उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्याला आणखी काही महिने लागणार आहेत. या मुद्यावर न्यायालयात पालिकेची कोंडी होणार असल्याने घाईगडबडीत नौपाड्यातील सोनी पथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत तो उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, या निर्णयाविरोधातील पडसाद नुकत्याच झालेल्या महासभेत उमटले होते. त्यामुळे पालिकेचा हा प्रयत्न फसण्याची शक्यता आहे.नौपाड्यात भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने आता पालिकेला पुन्हा कोपरीतील जागेत हे निवारे उभारण्याचे काम वेगाने करावे लागणार आहे. परंतु, कोपरीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही या रात्र निवारा केंद्राला विरोध दर्शविला आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दुले नकोत म्हणून त्यांनी नकार घंटा वाजविली आहे.कोपरीतील एका शिवसेनेच्या नगरसेविकेने याच मुद्यावरूनमंगळवारी पालिकेत एका उपायुक्ताच्या दालनात हुज्जत घातल्याचे दिसून आले आहे. या निवाºयांना कोपरीत नको तर दुसरीकडे कुठेही जागा द्या. त्यांच्यासाठी हवे तर आम्ही कपडे, जेवणाची सोय करतो. परंतु, आमच्या कोपरीत हे भिकारी नकोत अशी थट्टाच या नगरसेविकेने केली आहे.आयुक्तांशी पंगा कोण घेणार?याबाबत ही नगरसेविका थेट आयुक्तांना देखील पुढील दोन दिवसात निवेदन देणार असल्याचे समजते. केवळ याच नगरसेविकेचा विरोध नसून इतर काही नगरसेवकांनीदेखील याला विरोध केला आहे.परंतु, आयुक्तांशी पंगा घेणार कोण म्हणून काहींनी दबक्या आवाजात याला विरोध केला आहे. त्यामुळे आता रात्र निवारा केंद्राचे भवितव्यच अधांतरी दिसत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका