शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १५ हजारांची नोंदणी, जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूकपूर्व कामांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:43 IST

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष मतदारनोंदणी मोहीम हाती घेतली होती.

ठाणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष मतदारनोंदणी मोहीम हाती घेतली होती. त्यात सुमारे १५ हजार नवीन मतदारांनी नाव नोंदणी केल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदार नोंदणीच्या या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दरम्यान सुमारे १५ हजार नवीन नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील निवडणुकीपूर्वीच्या कामांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी स्वत: काही मतदानकेंद्रांना भेटी देऊन या मोहिमेची पाहणी केली. यात विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील सुमारे १३ हजार १३६ अर्ज स्वीकारण्यात आले. बेलापूर येथे सर्वाधिक दोन हजार ११२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मुंब्रा कळवा येथे सर्वात कमी म्हणजे ३८३ अर्ज आले आहेत.१ जानेवारीच्या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापी, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. दोन्ही दिवस सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारत होते. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी वेबसाईट व १९५० हेल्पलाईनचादेखील उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.> सुविधांची चाचपणीनार्वेकर यांनी विविध मतदानकेंद्रांना भेटी देऊन मोहिमेची पाहणी करून भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्याप्रमाणे मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा नाहीत हे तपासले.विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, लिफ्ट, व्हील चेअर आदी विविध सुविधा असल्याची खात्री त्यांनी करून घेतली.तसेच आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यांच्यासमवेत तहसीलदार निवडणूक सर्जेराव म्हस्के पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.