शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केले अब्युलेन्सचे दर, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असणारी लुट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:16 IST

शहरातील विविध खाजगी रुग्णालयांकडून रुग्णवाहीकेच्या माध्यमातून रुग्णांना लुटण्याचे जे काही प्रकारे सुरु होते. ते आता थांबणार असल्याचे दिसत आहे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाण्यातील रुग्णवाहीकेंचे दर निश्चित केले असून त्यानुसारच आकारणी करावी असे आदेश दिले आहेत. 

ठाणे  : मागील दिड महिन्यापासून ठाण्यातील कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या  पडत असतांना मात्र दुसरीकडे काही खाजगी रुग्णालयांकडून अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून कोरोना बाधीत किंवा इतर रुग्णांकडूनही लुट सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या तीन ते पाच किमीसाठी देखील 10 ते 15 हजार रुपये लुटले जात होते. आता प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत ठाणो शहरात खाजगी रुग्णवाहीकांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसारच भाडे आकारावे किंवा रुग्णांच्या घरच्यांनीही त्यानुसारच भाडे द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.             मागील काही दिवसापासून खाजगी रुग्णालयांकडून त्यांच्याकडे असलेल्या अॅम्ब्युलेन्सच्या माध्यमातून रुग्णांकूडन लुट केली जात होती. काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये आकरले जात होते. साधे बेथनी ते सिव्हील रुग्णालयार्पयत जरी जायचे असेल तर त्यासाठी देखील अशाच प्रकारे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. या संदर्भात मनसेच्या वतीने देखील आवाज उठविण्यात आला होता. अशा प्रकारे एखाद्याला परवडत नसतांनाही त्याच्याकडून रुग्णालयांकडून ही लुट सुरु होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक मात्र यात नाक होरपळला जात होता. आता प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रसाठी ठाणो शहरात खाजगी रु ग्णवाहिकेचे भाडे दर प्राधिकरणाने पुढे दर्शविल्याप्रमाणो निश्चित केलेले आहेत. त्यानुसारच भाडे आकारणी करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.रु ग्णवाहिकेचा प्रकार :मारु ती व्हॅन (अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी.   : रू. 500/-10 ते 20 कि. मी. : रू. 1000/-20 ते 30 कि. मी. : रू. 1500/-30 कि. मी. पेक्षा जास्त:  रू 20/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर:  रू. 50 प्रति तासटाटा सुमो व मॅटँडोर सदृश्य कंपनीने बांधीणी केलेली वाहने(अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी.   : रू. 600/-10 ते 20 कि. मी. : रू. 1200/-20 ते 30 कि. मी. : रू. 1600/-30 कि. मी. पेक्षा जास्त:  रू 23/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर:  रू. 50 प्रति तासटाटा 407/स्वराज माझदा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने(अवातानुकुलीत):00 ते 10 कि. मी.   : रू. 700/-10 ते 20 कि. मी. : रू. 1300/-20 ते 30 कि. मी. : रू. 1700/-30 कि. मी. पेक्षा जास्त:  रू 25/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर:  रू. 75 प्रति तासआयसीयु(वातानुकुलीत):00 ते 10 कि. मी.   : रू. 2000/-10 ते 20 कि. मी. : रू. 3000/-20 ते 30 कि. मी. : रू. 4000/-30 कि. मी. पेक्षा जास्त:  रू 55/- कि. मी.प्रतिक्षा कालावधीचे दर:  रू. 100 प्रति तास

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल