शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रीमाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 05:53 IST

बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपी रीमा ठक्करच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ठाण्याच्या

ठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपी रीमा ठक्करच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ठाण्याच्यागुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केली आहे. दीड वर्षापासून फरार असलेल्या रीमाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.कर चुकवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांशी आयआरएस (इंटर्नल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) अधिकाºयांच्या नावे संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. या प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी याला पोलिसांनी एप्रिल २०१७ मध्ये अटक केली होती. अटकेपूर्वीच विदेशातील बँक खात्यांमध्ये त्याने मोठी रक्कम वळती केली. या व्यवहारांमध्ये त्याची बहीण रीमानेही मदत केली. काही दिवसांपूर्वीच शॅगी जामिनावर बाहेर पडला. त्यानंतर काही दिवसातच रीमाने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.कॉल सेंटर प्रकरणात आरोपींनी कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांना आरोपींकडून गुन्ह्याची रक्कम वसूल करता आली नाही. या गुन्ह्याचा सूत्रधार शॅगी आणि त्याची बहीण बरेच महिने फरार होते.या कालावधीत त्यांनी पैशाची विल्हेवाट लावली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी चौकशीकामी रीमाच्या बँकखात्यांचा तपशील मागवला आहे. मात्र गुन्ह्यातून जमवलेल्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने रीतसर बँक खात्यांचा वापर केला असेल की नाही, याबाबत पोलीसही साशंक आहेत.