शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST

अजित मांडके ठाणे : गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागांत एसटीला आग लागल्याच्या किंवा आग लावण्याच्या घटना वाढताना ...

अजित मांडके

ठाणे : गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागांत एसटीला आग लागल्याच्या किंवा आग लावण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने ठाण्यातील एसटीच्या तीन मुख्य डेपोंमध्ये जाऊन याची चाचपणी केली असता एसटीच्या लालपरीची अवस्था दयनीय झाल्याचे दिसून आले. शिवशाही बस वगळल्या, तर एसटीच्या एकाही लालपरीत अग्निशमनयंत्र नसल्याचे दिसले. तसेच फस्ट एड बॉक्सही निव्वळ नावापुरते असून, त्यात कोणत्याही प्रकारची प्रथमोपचाराचे एकही औषध नव्हते. त्यामुळे ठाण्यातील लालपरी ही असुरक्षित असल्याचेच या पाहणीत आढळून आले.

एसटीची सेवा ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यांची अवस्था सुधरवण्यासाठी किंवा प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपाय केले; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसून आले आहे. त्यातही मागील काही दिवसांत एसटीला आग लागण्याच्या किंवा आग लावण्याच्या घटना वाढताना दिसल्या. असे असूनही ठाण्यातील एसटीमध्ये कुठेही त्या दृष्टिकोनातून सतर्कतेचे उपाय केले नसल्याचेच दिसून आले.

अग्निशमन यंत्रणा गायब

एसटीच्या एकाही लालपरीत अग्निशमन यंत्रणा नसल्याचेच दिसून आले. ते ठेवण्यासाठी खास जागा केली आहे; परंतु त्यात यंत्रच नसल्याचे दिसले. एसटीच्या सर्व लालपरींमध्ये हीच अवस्था असल्याची माहिती एसटी चालक व वाहकांनी दिली.

फस्ट एड बॉक्स नावालाच

एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली, तर फस्ट एड बॉक्समधील प्रथोमपचाराची औषधे असणे गरजेचे असते; परंतु एसटी प्रत्येक बसमध्ये हे बॉक्स पूर्णपणे रिकामे आहेत. काही बॉक्स तर फुटलेले तर काही केवळ दोरीने बांधून ठेवल्याचे दिसले. त्यामुळे एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

वायफाय यंत्रणा गायब

काही वर्षांपूर्वी एसटीचे प्रवासी वाढावेत म्हणून वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु आता ही सेवा इतिहासजमा झाल्याचे वाहक व चालक सांगत आहेत. काही महिने ही सुविधा सुरू होती. त्यानंतर एसटीमधील ही यंत्रणाच गायब झाली आहे.

एसटी आगारात ‘आओ जाओ घर तुम्हारा’

एसटीच्या खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन येथील आगारात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच अवस्था आहे. या तीनही ठिकाणी बाहेरची खाजगी वाहनेदेखील आत उभी केल्याचे दिसत होते. यात दुचाकींसह चारचाकींचा समावेश होता. कोणी कसाही येत असून, कुठेही बसत आहे. जायचे जरी नसले तरी काही जण डेपोत येऊन चकाट्या पिटताना दिसले.

स्मोकिंग झोन

आगारात सिगारेट किंवा विडी ओढू नये, अशा आशयाचे फलक लावलेले आहेत किंवा रंगरंगोटी केलेली आहे. मात्र, या डेपोमध्ये पाहणीत तशा प्रकारचे वातावरण दिसून आले नाही.

...

अशा घटना रोखण्यासाठी आम्ही संबंधित विभागातील प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. संशयित किंवा इतर कोणतीही व्यक्ती विनाकारण येत असेल, तर तिची चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तसेच काही बसमधील अग्निशमन यंत्रणांची मुदत संपल्याने त्या स्क्रॅप केलेल्या आहेत. नव्याने त्या मिळाव्यात यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

-विनोद भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे

.......

या बसमध्ये अग्निशमन यंत्र नाहीत

ठाणे ते जव्हार - एमएच १४, बीटी ३९७७

ठाणे ते नालासोपारा - एमएच २०, बीएल १०६३

ठाणे ते बोरिवली - एमएच २०, बीएल १४६४

..........

(सर्व छायाचित्रे : अजित मांडके)