केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचा लवकरच होणार पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:44 AM2019-08-01T00:44:46+5:302019-08-01T00:44:50+5:30

नव्या वास्तूत बहुमजली वाहनतळ : प्रभाग कार्यालयेही हलविणार इतरत्र

Redevelopment of KDMC's Dombivali Divisional Office will be soon | केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचा लवकरच होणार पुनर्विकास

केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचा लवकरच होणार पुनर्विकास

Next

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. महापालिका बीओटी तत्वावर हे काम करणार आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत येथील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयांचेही विकेंद्रीकरण केले जाणार आहे. दरम्यान, नवीन वास्तूत बहुमजली वाहनतळासह खाजगी आणि केडीएमसीच्या कार्यालये असणार आहेत.

केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय ४० वर्षे जुने असून, ते रेल्वे स्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. सध्या स्थानक परिसरातील वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करता या जागेचा वापर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी करण्यासाठी या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिकेचे कार्यालय होते. केडीएमसीची स्थापना झाल्याने त्याचा डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. तसेच डोंबिवली पूर्वेतील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये सध्या याच इमारतीत आहेत.

जागेचे महत्त्व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभाग क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी. पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. पी. पी. चेंबरमधील पहिला आणि दुसरा मजला ‘फ’ प्रभागासाठी घेतला जाणार आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करताना मुख्य वास्तूत सुसज्य वाहनतळ उभारण्यात येणार आहे. तळघर, दुसरा व तिसरा मजला वाहनतळासाठी असणार आहे. तळ व पहिला मजला खाजगी कार्यालये आणि व्यापारी संकुलासाठी असणार आहे, तर वरील मजले केडीएमसी कार्यालयासाठी असतील. बोडके यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत यासंदर्भातील कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुनर्विकास ‘बीओटी’तून
विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला असलातरी तो बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर केला जाणार आहे. सद्यस्थितीतील महापालिकेकडील आर्थिक स्त्रोताचा विचार करता हा प्रस्तावित प्रकल्प महापालिकेला स्वत:च्या निधीतून उभारणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या जागेचा मुलभूत आणि आर्थिकदृष्टया योग्य प्रकारे वापर करण्यासाठी खाजगीकरणातून हा प्रकल्प उभारणे सोईस्कर असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. दरम्यान, ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग अन्यत्र जागेत हलविण्यासंदर्भात येणाºया खर्चाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

६५६९.२० चौरस मीटर भूखंड
सध्या महापालिका विभागीय कार्यालयाच्या भूखंडावर के. बी. विरा शाळा आणि त्याशेजारीच महापालिकेच्या शाळेची इमारतही आहे. या व्यतिरिक्त उर्वरित जागेवर डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत आहे. या एकत्रित भूखंडाचे क्षेत्रफळ अंदाजे ६५६९.२० चौरस मीटर इतके आहे.

Web Title: Redevelopment of KDMC's Dombivali Divisional Office will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.