शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील शेतात बहरली लालभडक स्ट्रॉबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:00 IST

कुंदन पाटील यांच्या अभिनव प्रयत्नांना यश

नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेती म्हणजे फक्त पावसाळी भातशेतीचे पीक. त्यात ही सध्या तालुक्यात आलेले गोदाम व रिअल इस्टेटच्या व्यवसायामुळे भातशेती नष्ट होत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती कुंदन पाटील यांनी वालकस येथील  आपल्या शेतात चक्क महाबळेश्वर येथे पिकविल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे तिला आता मधुर आणि लालभडक फळे आली असून, या मधुर फळांची गोडी सध्या पाटील चाखत आहेत.दापोडे येथील मूळचे शेतकरी असलेले कुंदन पाटील यांचे वडील कै. तुळशीराम पाटील यांनी परिसरात गोदामांचा व्यवसाय वाढला असल्याने पडघानजीकच्या वालकस या गावात सात एकर शेतजमीन खरेदी करून तेथे शेतीची आपली परंपरा सुरू ठेवली होती. या शेतजमिनीत त्यांनी ठिबक सिंचनच्या माध्यमातून पांढरा कांदा, कलिंगड, टरबूज, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिर्ची, बटाटा, झेंडू आदींची लागवड केली आहे. अशातच महाबळेश्वरच्या मित्राच्या सल्ल्याने त्यांनी एक हजार स्ट्रॉबेरीची रोपे मागवून त्यांची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीला केली होती. मशागत करून योग्य ती काळजी घेतल्याने  रोपट्यांना आता फळे आली असून, आता ती चांगलीच बहरली आहेत. मी मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती स्वस्थ बसू देत नव्हती, त्यामुळे या शेतजमिनीत विविध प्रयोग करीत विविध भाजीपाल्याची लागवड केली. दररोज सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान मी स्वतः मशागत करीत असल्याने वेगळा आनंद मिळतो, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या या प्रयत्नांची माहिती समजल्यावर त्यांच्या शेतास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.