शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांना रेड रेसेन्ट सोसायटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:58 IST

होम क्वारंटाइन बाधितांना मोफत सिलिंडर

 

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : राज्यात एकीकडे ऑक्सिजन पुरवठ्याची टंचाई असल्याने कोरोना रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. अशातच भिवंडीतील होम क्वारंटाइन झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम रेड रेसेन्ट सोसायटी करीत आहेत. मुंबई येथील रेड रिसेन्ट सोसायटी या संस्थेच्यावतीने सोसायटी सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत देऊन त्यांना दिलासा दिला आहे. राज्यात कोरोना रुग्णांना आणि रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे आणि त्याअभावी कित्येक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यामुळे रेड रिसेन्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने मुंबई आणि जवळच्या शहरांमधील जे कोरोना रुग्ण घरी उपचार घेत आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात येत आहे. त्यानुसार या संस्थेच्या भिवंडीतील सदस्या कांबळे आणि ‘सोसायटीचे अध्यक्ष अर्शद सिद्दिकी यांनी भिवंडी शहरातील गृहविलगीकरणातील रुग्णांना १०० ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली.सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने रुग्णालयात बेड, ऑक्सिजनही मिळत नाही. त्यामुळे काही रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, अशा रुग्णांना या मोफत घरपोच मिळणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे मोठा दिलासा मिळत आहे. रात्री अचानक ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागली तेव्हा मी व्हाॅट्सॲपवर आलेल्या मेसेजनुसार कांबळे यांना रात्री ११ वाजता फोन केला आणि त्यांनी मला लगेचच घरपोच सिलिंडर पाठवला, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने दिली.‘समाधान मिळाले’आम्ही ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा होम क्वारंटाईन रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलिंडरची मदत करत आहोत. तो संपल्यावर पुन्हा भरूनही देणार आहोत. या कार्यामुळे आम्हाला समाधान मिळत आहे, अशी प्रतिक्रिया रेड रिसेन्ट सोसायटीच्या सदस्या स्वाती कांबळे यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन