शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका प्रशासनाचे धनाढ्य रुग्णालयासाठी रेड कार्पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:43 IST

नेत्ररुग्णालय उभारण्यासाठी संकरा नेत्रालयास महापालिकेने जागा देऊन तेथे हे रुग्णालय सुरू करण्यासाठीची तयारीही केली होती.

ठाणे : शहरात अत्याधुनिक स्वरूपाचे नेत्ररुग्णालय उभारण्यासाठी संकरा नेत्रालयास महापालिकेने जागा देऊन तेथे हे रुग्णालय सुरू करण्यासाठीची तयारीही केली होती. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडेही पाठविला होता. परंतु, शासनाच्या अटीमुळे या संस्थेने यातून माघार घेतली आहे. असे असले तरी या संस्थेसाठी देण्यात येणारा ५० कोटींचा भूखंड आता ठाण्यातील महागड्या व्यावसायिक रुग्णालयाच्या घशात घालण्याचा विडा उचलून प्रशासनाने तसा प्रस्तावच शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यामुळे आता हा प्रस्तावही विरोध झाला तरी सत्ताधारी मात्र तो मंजूर करून घेतील, अशी चर्चाही आहे.संकरा नेत्रालय मेडिकल रिसर्च फाउंडेशन या चेन्नईस्थित संकरा नेत्रालयाचे काम अद्वितीय असल्याने त्यांना ठाण्यातील भूखंड नाममात्र दराने देण्याचा प्रस्ताव पालिकेने सरकारला पाठवला होता. अपवादात्मक परिस्थितीत ही मागणी मान्य करून क्लॅरिअंट कंपनीच्या भूखंडावरील ११ हजार ६४३ चौरस मीटरचा भूखंड ३० वर्षांसाठी एक रुपया वार्षिक भाड्याने देण्याबाबतचा शासननिर्णय नगरविकास विभागाने १३ एप्रिल २०१८ रोजी जारी केला आहे. मात्र, ३० वर्षांनंतर भाडेपट्ट्याचे नूतनीकरण झाल्यास झाले नाही, तररुग्णालयासाठी उभारलेल्या इमारतीचा ताबा पालिकेकडे वर्ग करावा लागेल, अशी अट सरकारने घातली. ती व्यवहार्य नसल्याच्या मुद्यावर संकराने माघार घेतली.>सत्ताधारी आणि प्रशासनाची हातमिळवणी?प्रशासनाने शासनाच्या अटींचा आधार घेऊन आता नवी शाळा खेळण्याची तयारी सुरूकेली असून शासनाच्या त्याच निर्णयाचा आधार घेऊन आणि त्याच अटीशर्तींवर हा भूखंड पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या एका व्यावसायिक आणि शहरांतील सर्वात महागडी रु ग्णसेवा देणाºया रु ग्णालय व्यवस्थापनाला घशात घालण्याची तयारी चालवली आहे.यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी होणाºया महासभेत ठेवला आहे. महासभेत आता याबाबत विरोधक आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात, याकडे आता समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात हातमिळवणी केली असल्याने ते या प्रस्तावाला मंजुरी देतील किंवागोंधळात हा प्रस्ताव मंजूर करतील, अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.