शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"दिवा येथील लोकप्रतिनिधींकडून विकासकामांच्या आड होतेय वसुली"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 02:44 IST

Diva News : स्थानिक लोकप्रतिनिधी कामाच्या नावे टेंडर काढून पैसे उकळत असल्याचा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.

ठाणे : दिव्याखाली मागील तीन वर्षांपूर्वी अंधार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. तो अंधार अजून तसाच आहे. दिव्याबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाचा दृष्टिकोन सकारात्मक नसून, या भागात भ्रष्टाचाराचे रान उभे राहिले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी कामाच्या नावे टेंडर काढून पैसे उकळत असल्याचा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.दिव्यातील तीन ते चार कामांसह ओव्हर ब्रीजच्या कामाबाबत त्यांनी ठामपा आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी भेट घेऊन आढावा घेतला. ब्रीजच्या कामात इमारती, ४०० च्यावर घरे बाधित होणार आहेत. त्या बाधितांना कुठे घरे मिळणार आहेत, ब्रीज होणार आहे का? याची माहिती घेऊन तो दिव्याच्या बाहेरून ब्रीज करावा, अशी मागणी केली. तेव्हा आयुक्तांनी त्या कामाचे टेंडर निघाल्याचे सांगून, काही सूचना केल्या असून, त्याबाबत पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पाटील  यांनी सांगितले.अधिकाऱ्यांसह करणार दिव्याचा दौरा दिव्यात सत्ताधारी आणि प्रशासनाचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्याने अजून दिव्याखाली अंधार असल्याचे दिसत आहे. दिव्यात सध्या ४०० ते ८०० कोटींची कामे सुरू आहेत, पण ती कामे सुरू असल्याचे दिसत नाही. या कामांच्या फाइल घेऊन स्वतः महापालिका अधिकाऱ्यांसह दिव्याचा दौरा करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केले. दिव्याकडे डम्पिंग ग्राउंड म्हणून पाहिले जात आहे. ती ओळख दिव्यात भविष्यात चांगले कामे करून बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलdivaदिवा