शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसेवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:29 IST

जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला.

डोंबिवली - जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर स्टेशनरीचे पैसे घेतले असल्याचा खुलासा महाविद्यालयाने केला आहे.इयत्ता बारावीतील कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल महाविद्यालयाने रोखून धरला होता. निकालाची प्रत हवी असल्यास जीएसटीची ४५० रुपयांची रक्कम भरावी लागेल, असे महाविद्यालयाचे म्हणणे होते. काही विद्यार्थ्यांनी ही रक्कम भरली, पण त्या बदल्यात त्यांना दिलेल्या पावतीवर ‘स्टेशनरी’ असा उल्लेख होता. त्यामुळे स्टेशनरीचे पैसे भरलेले असताना पुन्हा जीएसटीच्या नावाखाली पैसे घेऊन स्टेशनरीचे पैसे घेतल्याचे का दाखवले जात आहे, याविषयी विद्यार्थ्यांनी ओरड केली. याप्रकरणी एका विद्यार्थिनीने विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सचिन दोंदे यांच्याशी संपर्क साधला. दोंदे यांनी महाविद्यालयात धाव घेत विचारणा केली असता त्यांनाही नीट माहिती देण्यात आली नाही.दरम्यान, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांनी थेट महाविद्यालयाचे प्रभाकर देसाई यांच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांकडून जीएसटी वसूल केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.चुकून ‘जीएसटी’ उल्लेखयासंदर्भात पेंढरकर महाविद्यालयाने कळवले आहे की, शैक्षणिक शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर लावली होती. त्यात चुकून ‘जीएसटी’ असा उल्लेख झाला होता. मात्र, हे पैसे स्टेशनरीचे थकले होते. आता नव्या व जुन्या शैक्षणिक शुल्कांचा तपशील वेगवेगळ्या स्वरूपात कळवला आहे.

टॅग्स :GSTजीएसटीStudentविद्यार्थी