शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

चंद्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हात ४२४ प्रकल्पाची विक्रमी नोंदणी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 14, 2023 11:12 IST

नवी मुंबई महानगर शाळेतील बाल वैज्ञानिकांची कौतुकास्पद कामगिरी.

ठाणे: भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत चंद्रयान मोहिमेच्या पाश्व्भुमीवर यावर्षी ठाणे जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहापूर, मुरबाड आणि नवी मुंबई महानगर पालिका शाळा या शाळांचा हि समावेश होता. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, नवी मुंबई म.न.पा.चाय शाळन मधील ७५ प्रकल्पांची जिल्हा स्तरीय निवड झाली आहे. 

गेली ३१ वर्षे ही राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी संशोधनाकडे वळावे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या वर्षीची परिषद २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान संपन्न होणार आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेस प्रत्येक राज्यातील निवडक बाल वैज्ञानिक सहभागी होऊ शकतात. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे हि संस्था सन २००० पासून महाराष्ट्र राज्यात बाल विज्ञान परिषदेचे संघटक म्हणून कार्य करत आहे.या वर्षीचा मुख्य विषय “आरोग्य आणि स्वास्थासाठी परिसंस्था समजून घेणे” आहे.

यशस्वी चंद्रयान मोहिमेच्या पाश्व्भुमीवर या वर्षी ठाणे जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. या बाल वैज्ञानिकानी सादर केलेल्या त्यांच्या संशोधन प्रकल्पाच्या आराखड्याच्या आधारे ठाणे जिल्हास्तरीय परिषदेसाठी २६३ प्रकल्पांची निवड झाली आहे. या मध्ये इंग्लिश , मराठी , तसेच हिन्दी माध्यमाच्या शाळांचा सहभाग आहे. पुढील शाळांचे प्रकल्पांची निवड झाली : अल हसंत यांग्लो उर्दू स्कूल २, डॉ. बेडेकर विद्यालय ४, हॉली क्रॉस कॉन्वेट हायस्कूल २ , चंद्रकांत पाटकर विद्यालय ४ , लोकपूरम पब्लिक स्कूल २ , एम ई स क्रीसेंट इंग्लिश स्कूल ७ , नवोदय इंग्लिश हायस्कूल ३ , नवी मुंबई महानगरपालिका मधील वेगवेगळया शाळेतील ७५ , सरस्वती विद्यालय , घोडबंदर रोड, ठाणे - १० , सरस्वती सेकंडरी स्कूल मराठी माध्यम १३ , श्रीरंग विद्यालय इंग्लिश स्कूल ११ , श्री हरिक्रिशन इंग्लिश स्कूल ३, श्री के कोतकर विद्यामंदिर डोंबिवली १७, श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर २, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ४७ , श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया स्कूल २७, सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश स्कूल ६ , सौ. ए. के. जोशी इंग्लिश मि. स्कूल ५, सेंट लॉरेन्स हायस्कूल १९ , ठाणे महानगरपालिका शाळा नं ११२ - १ , सिग्नल शाळा १ अशा शाळांचा समावेश आहे. 

ठाणे जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषद १८ व १९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. या परिषदेत बाल विद्यार्थ्यांना आपण निवडलेल्या विषया वर १५०० ते २००० शब्दात लिहिलेला संशोधन प्रकल्प, चार तक्याच्या माध्यमातून ६ मिनिटात परीक्षकांसमोर सादर करावयाचा आहे. जिल्हा स्तरावरून निवडलेले प्रकल्प राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवडले जातील अशी माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3thaneठाणेSchoolशाळा