शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात गुढीपाडवा निमित्त आयोजित स्वागतयात्रा जोशात, जल्लोषात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 14:36 IST

ठाणे शहरात गुढीपाडवा निमित्त आयोजित स्वागतयात्रा जोशात, जल्लोषात संपन्न झाली. राजकीय मंडळींची उपस्थिती या स्वागतयात्रेमध्ये होते.

ठळक मुद्देठाणे शहरात स्वागतयात्रा जोशात, जल्लोषात संपन्नमहिलांची बाईक रॅली, लेझीम पथक, ढोल ताशांचा गजर, प्रथमच असलेला सोसायटांचा सहभाग महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पालखीस सुरूवात

ठाणे : महिलांची बाईक रॅली, लेझीम पथक, ढोल ताशांचा गजर, प्रथमच असलेला सोसायटांचा सहभाग, विविध वेशभूषा, मान्यवरांची मांदियाळी, तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठांची उपस्थिती, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, रांगोळ््यांच्या पायघड्या आदींनी कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागतयात्रा उत्साहात, जोशात पार पडली.श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित भारतीय नववर्ष स्वागत यात्रा रविवारी ठाणे शहरात पार पडली. सकाळी पावणे सात वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पालखीस सुरूवात झाली. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे पुजन करुन तेथून पालखीचे प्रस्थान झाले. सुरूवातीला पालखीचे भोई पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर रंगोत्सव बापुजी गुप्ते चौक येथून स्वागतयात्रेस सुरूवात झाली. गोखले रोड येथे मध्यभागी शिवसेनेच्या वतीने व्यासपीठ उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर जाऊन पालखीवर पालकमंत्री, महापौर व इतर राजकीय मंडळींनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. दरम्यान, ‘हर हर महादेव’, ‘कौपिनेश्वर महाराज की जय’, ‘ऊॅँ नम: शिवाय’ चा नारा दिला जात होता. पारंपारिक वेशभूषेत असलेली महिलांची लक्षणीय उपस्थिती यंदाच्या स्वागतयात्रेचे आकर्षण ठरले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर या शाळेचे स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी सायकल यात्रा काढली होती तर काही विद्यार्र्थ्यांचे लेझीम पथक होते. ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठानचे सदस्य टाळ, ढोलकी घेऊन सहभागी झाले होते यावेळी साई बाबांची पालखीचा देखील स्वागतयात्रेत सहभाग होता. झवेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यामंदिर, विद्याभवन वसतीगृह, ठाणेचे विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते. ब्रह्मकुमारी राजयोग सेवा केंद्र, ठाणे या संस्थेचे सदस्य स्वच्छ परिसरचा संदेश देत सहभागी झाले होते. हरियाली या संस्थेच्यावतीने बियाणे आणि रोप वाटप केले. सरस्वती क्रिडा संकुलाच्यावतीने जिम्नॅस्टीकचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. राम मारुती रोड येथे ढोल ताशाचा गजर झाला. ढोकाळी नाका येथील सोसायचीचे २५ रहिवाशी सायकलीला गुढी व भगवे झेंडे लावून सहभागी झाले होते. राम मारुती रोड आणि तलावपाळी येथे तरुणाईची सर्वाधिक गर्दी दिसून आली. झेंडा नृत्य, तलवार नृत्य देखील स्वागतयात्रेत सादर झाले. लक्ष्मीनारायण सोसायटी रेसिडन्सी या सोसायटीचे तब्बल ८० रहिवाशी यात सहभागी झाले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या चित्ररथाने प्लास्टीकचा वापर टाळा असे सांगत ‘घातक प्लास्टीकचा ध्यास, हरवेल पर्यावरणाचा श्वास’ हा संदेश दिला. बाळकुम पाडा नं. ३ येथील कोळी वेशभूषेत सहभागी झालेले मासेमारी दालदी मंडळ देखील आकर्षण ठरले. या मंडळाने आगरी कोळी संस्कृती दाखविली आणि कोळी गीतांवर नृत्यही सादर केले. अनेक चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. दगडी शाळा येथून निघालेली स्वागतयात्रा तीन पेट्रोल पंप - हरिनिवास - गोखले मार्ग, राम मारुती रोड - तलावपाळी - गडकरी रंगायतन या ठिकाणी स्वागतयात्रा समाप्त झाली व पालखीचे विसर्जन श्री कौपिनेश्वर मंदिरात झाले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई