शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
5
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
6
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
7
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
8
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
9
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
10
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
11
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
12
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
13
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
14
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
15
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
16
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
17
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
18
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
19
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
20
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 

साठेनगरात मुलांमध्ये रुजणार वाचन संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:32 AM

अनुबंधतर्फे ‘वाचनालय आपल्या दारी’; विविध प्रकारची ११० पुस्तके उपलब्ध

कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर असलेल्या साठेनगर या लोकवस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनुबंध ही संस्था करत आहे. आता या संस्थेने तेथील मुलांच्या शिक्षणासाठी ‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे.सध्या अनलॉक झाले असले, तरी शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, गरीब कुटुंबांतील मुलांकडे टॅब, लॅपटॉप, स्मार्ट फोन नाहीत. केडीएमसी शाळेत शिकणारे ४० टक्के विद्यार्थी हे शिक्षणासाठी साधन नसल्याने आॅफलाइन आहेत. त्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती साठेनगरातील नाही. तेथील नागरिक हे डम्पिंगवरील कचरा उचलून त्याचे वर्गीकरण करण्याच्या कामावर उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनुबंध करत आहे. आता या संस्थेने तेथील मुलांसाठी ‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.उंबर्डे येथील बीएसयूपी प्रकल्पातील इमारतीत दरशनिवारी हा उपक्रम राबवला जात आहे. त्या मराठीतील बोधकथा, इसापनीती आदी ११० पुस्तके या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या उंबर्डे येथे सुरू असलेला हा उपक्रम पुढील कालावधीत पाणबुडेनगरातील वस्तीवरच्या मुलांसाठी सुरू केला जाणार आहे, अशी माहिती अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी दिली आहे.साने गुरुजी, संत कबीर यांच्या पुस्तकांना मागणीउंबर्डे येथील उपक्रमाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साने गुरुजी, संत कबीर यांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी संस्थेकडे केली आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.