शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

रिक्षाप्रवास दोन रूपये स्वस्त

By admin | Updated: October 7, 2016 05:14 IST

कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला

अनिकेत घमंडी / डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला आहे. त्यामुळे या रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कल्याण आरटीओने घेतला आहे. तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच ३५ लाख प्रवाशांचा रोजचा प्रवास स्वस्त होईल.हकीम समितीच्या निकषांचा आधार घेत हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाणे शहरात ज्या प्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी १८ रुपये भाडे आकारले जाते, त्याच पद्धतीने या शहरातही आकारले जाईल. सध्या या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येते. भाड्याचे नवे सूत्रपेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना इंधन स्वस्त पडते. अनकेदा इंधनांच्या वाढीमुळे भाडे वाढवले जाते. आता सीएनजी सुविधेमुळे भाडेही कमी करावे आणि सीएनजीच्या खर्चानुसार भाड्याची नवी रचना ठरवावी, असे आरटीओचे म्हणणे आहे.एमएमआरटीए घेणार निर्णयच्कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या या सर्व शहरांत २० हजार रिक्षा आहेत. त्यातील सुमारे १८ हजार रिक्षा सीएनजीवर चालतात. तर ५०० रिक्षा एलपीजीवर चालतात. हकीम समितीच्या निकषांनुसार ६० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर चालत असतील, तर सीएनजीच्या दराच्या सूत्रानुसार भाडे आकारावे लागते. त्याची अंमलबजावणी ठाण्यात होते. च्ती कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली-कल्याण, टिटवाळा ते बदलापूरपर्यंतच्या सर्व शहरांमध्येही होण्याची गरज आहे. तशी ती व्हावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरटीओने सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. च्याबाबत निर्णय घेण्यासाठी ५ आॅक्टोबरला एमएमआरटीएची बैठक होणार होती. तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील बैठकीत हा निर्णय होईल.शेअर भाड्यातही कपातच्शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षाचालकांनाही सध्याच्या भाड्यात कपात करावी लागेल. ते भाडेही साधारण दोन रूपयांनी कमी होईल. शेअर रिक्षांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा निश्चितच फायदा होईल. च्डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी शेअर पद्धतीने जाण्यासाठी किमान १० रुपये, तर अन्य ठिकाणी १२ रूपयांपासून २० रूपये आकारले जातात. मात्र या शेअर भाड्यावर कुणाचाही अंकूश नाही. पुन्हा मीटरसक्ती 1या सर्व शहरांमध्ये सुमारे ७५ रिक्षा स्टँड असून डोंबिवलीत २८, तेवढेच कल्याणमध्ये, बदलापूर ६, अंबरनाथ ६ अशा प्रमाणात अधिकृत स्टँड आहेत.2ठाण्याप्रमाणेच रिक्षा चालकांना शिस्त लागावी, यासाठी या शहरांमध्येही मीटरची सक्ती करण्यात येणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठीही संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले आहे. मीटरसक्ती झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना हाईल. अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यावर मर्यादा येईल.