शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षात घुसमट होत असल्याने घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:42 IST

 डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ठळक मुद्दे डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डोंबिवलीमध्ये नवीन शहर प्रमुखांच्या नियुक्ती नंतर रवी पाटील यांनी शिवसेना जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा काँग्रेसची वाट धरली आहे.

डोंबिवली-  डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डोंबिवलीमध्ये नवीन शहर प्रमुखांच्या नियुक्ती नंतर रवी पाटील यांनी शिवसेना जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा काँग्रेसची वाट धरली आहे. रवी पाटील यांनी 2015 च्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढविली पण त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. डोंबिवलीच्या आहेरे गाव विभागातून रवी पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या मतदार संघात रवी पाटील यांना भाजपाच्या अॅडव्होकेट तावरे यांची तगडी टक्कर होती. रवी पाटील यांचा पराभव हा शिवसेनेला धक्का मानला जात होता. 

गुरुवारी रात्री टिळकभवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रकाश मुथा यांनी पाटील यांना पुन्हा पक्षात प्रवेश घ्यावा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रवेश घेतल्याचं कल्याण-डोंबिवली महापालिकेचे गटनेते नंदू म्हात्रे यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेत माझी घुसमट होत होती, संघटनेत काम केलेला मी माणूस आहे, विधानसभा लढवली असून, तीन वेळा नगरसेवक होतो, पण तरीही मला एका बाजूला ठेवण्यात आलं. हे योग्य नाही, त्यामुळे मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचं रवी पाटील यांनी म्हंटलं आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसdombivaliडोंबिवली