शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:31 IST

स्वच्छ भारत अभियानाचे धिंडवडे; रेल्वेचा डब्यातील अटेंडंट होता गायब, प्रवाशांमध्ये गोंधळ

डोंबिवली: कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते व विधि अधिकारी ललीत वाईकर हे सह्याद्री एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असतांना ‘एस-६’ या बोगीमध्ये प्रवाशांच्या बॅगवर जीवंत उंदीर फिरताना आढळून आल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. मंगळवारी सकाळी कर्जत ते नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या रेल्वे प्रशासनाची अनास्था या निमित्ताने उघड झाली आहे. रेल्वे हा उंदरांसारख्या प्राण्यांचा अड्डा आहे का? असे वाईकर म्हणाले.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा दिखावूपणा कशाला हवा असा संतप्त सवाल वाईकर यांनी केला. देशभर स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. केंद्रापासून ते गल्लीपर्यंत त्याचे नारे दिले जातात. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, सामाजिक संस्था त्यासाठी नियोजन करतात, पण ते खरे नसून सगळा दिखावा असल्याची टीका त्यांनी केली. बॅगवर मोठा उंदीर बघून डब्यात एकच कल्ला झाला. डब्यात कोणताही अटेंडंट नसल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न होता. रेल्वेच्या डब्यात असा मोठा उंदीर वावरत असेल तर प्रवासी सुरक्षित प्रवास कसा करु शकतील, असा सवाल करुन वाईकर म्हणाले की, लहान मुले असो की, वृद्ध यांना रात्री झोपेत उंदीर चावला तर त्याला जबाबदार कोण? डब्यातील उंदराच्या वावराचा किळसवाणा प्रकार संतप्त करणारा असल्याने आपण तातडीने सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केल्याचे ते म्हणाले. प्रवाशांच्या सोबत अन्नपदार्थ असतात. खाद्यपदार्थांच्या पिशवीत उंदीर शिरला असता तर, असा सवाल करुन वाईकर म्हणाले की, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गृहित धरु नये. प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेता तर त्यांना चांगली, दर्जेदार सुविधा देणे रेल्वेचे कर्तव्य आहे. गलिच्छ कारभार करु नका, अशा शब्दात त्यांनी रेल्वे प्रशासनाचे कान टोचले आहेत. हा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात त्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या विषयाला वाचा फोडावी, आणि रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा अशी मागणी केली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे