शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ स्टॉर्क बर्डचे ठाण्यात दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:34 IST

जवळपास साडेतीन ते चार फुट उंच तसेच एक ते दीड फुट लांब चोच असलेला करडा-काळ्या रंगाच्या ‘स्टॉर्क’ या दुर्मिळ पक्षाचे जखमी अवस्थेत कल्याण येथे दर्शन झाले.

ठाणे : जवळपास साडेतीन ते चार फुट उंच तसेच एक ते दीड फुट लांब चोच असलेला करडा-काळ्या रंगाच्या ‘स्टॉर्क’ या दुर्मिळ पक्षाचे जखमी अवस्थेत कल्याण येथे दर्शन झाले. ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला मराठीत ‘तुटवडा’असे संबोधले जाते. हा पक्षी प्रामुख्याने अमेरिका, युरोप आणि आशिया या देशांत वेगवेगळ्या छटांमध्ये आढळून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्टॉर्क (तुटवडा) हा पक्षी जखमी अवस्थेत कल्याणमध्ये वन विभागाच्या निदर्शनास आला. लांब पंख असलेल्या या पक्ष्याच्या एका पंखाला जखम झाल्याने त्याला भरारी घेता येत नव्हती. त्याला ८ जानेवारी रोजी वनविभागाने ठाण्यातील एसपीसीए या पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या संस्थेत उपचारार्थ दाखल केले. तेव्हापासून त्याला वेदनाशामक आणि विविध प्रकारचे टॉनिक दिले जात आहे. नर जातीच्या या पक्ष्याचे वजन साधारणता: तीन ते साडेतीन किलो आहे. त्याची उंची साडेतीन ते ४ फुट असून, चोच जवळपास १ ते दीड फुट लांब आहे. त्याचे पाय दीड ते दोन फुट इतके उंच आहेत. पंखही लांब आहेत. हा पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागी आढळून येतो. छोटे-छोटे मासे, कीडे हे त्याचे आवडते खाद्य आहे.>स्टॉर्क बर्ड अमेरिका आणि युरोपमध्ये पांढºया रंगछटात आढळून येतो. काही दिवसांपासून तो औषधाला प्रतिसाद देत असून, सध्या त्याला उडता येत नाही. जखम बरी झाल्यावर ज्या परिसरात तो आढळून आला तेथे त्याला वनविभागामार्फत सोडले जाईल, अशी माहिती या पक्ष्यावर उपचार करणारे संस्थेचे वैद्यकीय अधिकारी सुहास राणे यांनी दिली.