शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 04:39 IST

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडले असून, तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात ते भरण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस पडला असून, नद्या ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणीसाठाहोता. तो सोमवारी ६४ टक्के झाला. बारवी धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास ते भरण्याची शक्यता आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात रात्रभरात चार टक्के साठा वाढला आहे. बदलापूर बंधारा धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मोहने बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.>विहार तलाव भरलामुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी कायम आहे़ यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ तुळशी, मोडकसागर पाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहू लागला़ तर तानसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे़विहार तलावातून रोज मुंबईला ११० दशलक्ष लीटर जलसाठा होतो़ शनिवारी तलावांमध्ये सात लाख दशलक्ष लीटर साठा होता़ यात वाढ होऊन नऊ लाख ३४ हजार दशलक्ष लीटर साठा झाला़ वर्षभर आवश्यक साठ्यापैकी ६४ टक्के साठा तलावांत आहे.>कल्याण-नगर मार्ग बंदउल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण-शीळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने, कल्याण-मुरबाड-नगर या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली, टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहत असल्याने, तेथील वाहतूकदेखील बंद केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत एक हजार ९६.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी नोंद घेतली असून, आतापर्यंत ५११.८२ मिमी पाऊस झाला आहे. यात ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के, भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरण