शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडित मुलीवर न तपासताच केले औषधोपचार; तलासरी आरोग्य केंद्रातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 08:38 IST

डॉक्टरांच्या मनमानी कारभाराचा फटका पीडित मुलीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तलासरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तलासरी पोलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अत्याचार झाल्यानंतर लगेच मुलीला घेऊन तिचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. पण, तेथील कार्यरत डॉक्टरांनी तिला न तपासता गोळ्या व औषधे देऊन घरी पाठविल्याने संताप व्यक्त होत आहे. 

तलासरी तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. १३ वर्षीय शाळकरी मुलीवर १३ तारखेला संध्याकाळी एका नराधमाने अत्याचार केला. 

अत्याचारानंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिला घरच्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री आठ वाजता  नेले. पण, संध्याकाळ झाल्याने व ओपीडी बंद केल्याने आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तिला न तपासता मुलीने हातपाय व पोट दुखत असल्याचे सांगितल्याने तिला गोळ्या व औषध देऊन घरी पाठविले. पीडित मुलीला डॉक्टरांनी तपासून कारणे विचारली असती तर अत्याचारानंतर लगेच घटना उघडकीस आली असती. पण, डॉक्टरांच्या मनमानी कारभाराचा फटका पीडित मुलीला बसला आहे.

२४ तास मिळत नाही आरोग्यसेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन-तीन दिवस काम करून घरी जातात. यामुळे रुग्णांना २४ तास आरोग्यसेवा मिळत नाही. या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून त्यांनी स्वतः तीन-तीन  दिवसांचे काम वाटून घेतले आहे. एका डॉक्टरने तीन दिवस काम केल्यावर त्याने घरी जायचे व दुसऱ्याने आरोग्य केंद्रात यायचे, अशा मनमानी कामामुळे रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्यसेवा मिळत नाही. आठवड्याला तीन दिवस काम करून पगार मात्र पूर्ण घ्यायचा, असेच येथे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तलासरी पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांसह, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. आदिवासी समाज सोयी सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. तलासरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत कोळी यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.