शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:29 IST

५०० व्या विक्रमी कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्याचा नवीन वर्षाचा पहिला रविवारविनोदी एकांकिकेचे धम्माल सादरीकरणाने रंगला.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे ‘द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या सदस्यांचा सत्कारएक धम्माल एकांकिकेद्वारे नवीन वर्षाची सुरु वात

ठाणे: अभिनय कट्ट्याचा नवीन वर्षाचा पहिला रविवार रंगला विनोदी एकांकिकेचे धम्माल सादरीकरणाने. एक धम्माल एकांकिकेद्वारे नवीन वर्षाची सुरु वात अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी एकदम जबरदस्त केली.       चाळ म्हणजे विविध नमुन्यांनी भरलेला विविधरंगी विविधढंगी व्यक्तिचित्रे चाळीत आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एक चाळीतील एक सामान्य कुटुंबातील एक शांत रविवारची गडबड आणि गोंधळाची सकाळ म्हणजे प्रा.अनिल सोनार लिखित आणि परेश दळवी दिग्दर्शित  शांतता.. गडबड चालू आहे. रामराव आणि त्यांच्या पत्नी, त्यांचा मेव्हणा, त्यांची दोन कार्टी, शेजारी अय्यर आणि विवाह मंडळाचे देशपांडे यांच्या सोबत रामरावांच्या घरात सुरू झालेली गडबड संपता संपता शेजारच्या घरात गडबड सुरू होते आणि आणखी एक शांत रविवार गडबड गोंधळाची कसा होतो याचा धम्माल विनोदी सादरीकरण म्हणजे शांतता...गडबड चालू आहे. या एकांकिकेचे संगीत श्रेयस साळुंखे रंगभूषा दीपक लाडेकर, नेपथ्य काशिनाथ चव्हाण आणि दळवी यांनी सांभाळले. या एकांकिकेत चिन्मय मोर्ये, वैष्णवी चेऊलकर, अभय पवार, सहदेव साळकर, महेश झिरपे, न्यूतन लंके आणि दळवी यांनी अभिनय साकारला. तसेच २०१९ मध्ये अभिनय कट्टा बाल संस्कार शास्त्राच्या चिन्मय मौर्ये, श्रेयस साळुंखे, अमोघ डाके, अद्वैत मापगावकर, प्रथम नाईक, आदित्य भोईर, स्वस्तिका बेलवलकर, वैष्णवी चेऊलकर, पूर्वा तटकरे आणि रु चिता भालेराव बालनाट्य, एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट या क्षेत्रांत केलेल्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला. सन्मान संस्थेचा, जनहिताच्या महान कार्याचा या उपक्र माअंतर्गत विविध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या संस्थेचा म्हणजेच ‘द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या सदस्यांचा सत्कार कट्ट्यावर करण्यात आला. या कार्यक्र माचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी यांनी केले. सामाजिक भान जपणाऱ्या अभिनय कट्ट्यावर नेहमीच विविध सामाजिक प्रकल्प राबविले .कट्टा क्रमांक ४६२ वर सन्मान संस्थेचा,जनहिताच्या महान कार्याचा या उपक्रमाअंतर्गत विविध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.त्यातील पहिल्या संस्थेचा म्हणजेच द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन या संस्थेच्या सदस्यांचा सत्कार अभिनय कट्ट्यावर करण्यात आला.ह्या संस्थेमार्फत घरोघरी जाऊन रद्दी जमा केली जाते व त्यातून येणाऱ्या निधीचा उपयोग सामाजिक कामांसाठी केला जातो. संस्थेचा मूळ हेतू गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी मदत हा पुरविणे आहे. आज आम्ही समाजातील गोरगरिबांसाठी एक छोटस पाऊल उचलल आहे अभिनय कट्ट्याने दिलेल्या ह्या प्रोत्साहनामुळे आमच्या ह्या कार्याला नवीन उमेद मिळाली आहे.आपले सहकार्य सोबत असुदे बदल घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू असे मत "द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन" चे अध्यक्ष प्रणव पाटील ह्याने व्यक्त केले. नवीन वर्षाची सुरुवात शांतपणे गडबड करून आपण केली.पुढील वर्षभरात अभिनय कट्टा प्रत्येक रविवारी वाचक कट्टा गुरुवारी संगीत कट्टा शुक्रवारी वेगवेगळे विविधरंगी कार्यक्रम आपल्या सेवेस घेऊन येऊच. प्रोत्साहन हे गरजेचे असते म्हणूनच बालकलाकारांयापुढील वाटचाली साठी त्यांच्या ह्या वर्षातील कामाचे कौतुक वझालेच पाहिजे तसेच "द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन" ही चळवळ समाजातील गोरगरिबांसाठी खूपच मोलाची आहे एक माणूस म्हणून आपण आपक्या जाणिवा जागृत ठेवून आपण आपल्यापरीने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.अभिनय कट्टा परिवार नेहमीच त्यांच्या सोबत आहे, असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक