शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘रामलीला’ चणिया चोलीला मागणी कायम

By admin | Updated: October 14, 2015 02:40 IST

‘रामलीला’ चित्रपटातील ‘ढोल बाजे’ या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया चोली ही रामलीला चनिया चोली नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला दोन वर्ष उलटून गेले तरी बाजारात या चोलीला मागणी कायम आहे

जान्हवी मोर्ये, ठाणे ‘रामलीला’ चित्रपटातील ‘ढोल बाजे’ या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया चोली ही रामलीला चनिया चोली नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला दोन वर्ष उलटून गेले तरी बाजारात या चोलीला मागणी कायम आहे. कारण चित्रपटातील पेहरावाची भुरळ आजही शहरी तरूण पिढीवर कायम आहे. यंदा ही बाजारात तरूणींकडून गरबा व दांडिया नृत्यासाठी या चोलीच खरेदी केली जात आहे.या चोलीला घेर जास्त आहे. गुजराती व राजस्थानी चणिया चोलीचा मिलाफ या चणिया चोलीत पाहायला मिळतो. बाजारात गरबा व दांडिया नृत्य खेळण्यासाठी लागणारे नवीन पॅटर्नचे ड्रेस बरेच आले आहेत. ड्रेस घेण्याकडे मुलींच्या तुलनेत मुलांचा कल कमी आहे. शाळांमध्ये नवरात्री सेलिब्रेशन होत असल्याने लहान मुलांमध्ये ड्रेस खरेदी जास्त प्रमाणात केली जाते. मुलींसाठी ५०० ते अडीच किंवा तीन हजार रूपयांपर्यंत ड्रेस बाजारात उपलब्ध आहेत. मुलांमध्ये १२५ ते ९०० रूपये दराचे ड्रेस बाजारात आहेत. सलमान खान जॅकेट व लगान चित्रपटात आमीर खान याने घातलेल्या केडिया जॅकेटला बाजारात जास्त मागणी आहे. तरूणांसाठी काठीयावाडी जॅकेट व डोक्याला गुजराथी स्टाईलचा फेटा अशा पारंपारिक पद्धतीचा पेहराव उपलब्ध आहे. नवरात्री ड्रेसमध्ये साधी कारागिरी व कॉम्प्युटरवर तयार केलेल्या डिझाईनमध्येही ड्रेस मिळतात. चणिया चोलीवर बांधणी प्रिंट, अबला वर्कचे, कशिदा कलाकुसरीचे भरगच्च भरतकाम केलेले आहे. गरबा खेळताना बॅकलेस चोलीची फॅशन जोरात आहे. त्यांच्या नाड्या खूप चांगल्याप्रकारे सजविलेल्या असतात. याशिवाय स्लिव्ह्जलेस, डीप यू नेक व त्यावर केलेले वर्क अशा चोली बाजारात आहेत. तर घागऱ्यांमध्ये बांधणी, राजस्थानी, लेहरिया प्रिंटचा वापर केला जातो. तसेच घागऱ्यांना कवड्या, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवलेले जाते. चनिया चोलीबरोबर नव्या पद्धतीचे जॅकेट्स ही बाजारात आले आहेत. त्यावर खास गुजराथी काठीयावाडी स्टाईलच्या कवड्या, काचा लावलेली कलाकुसर पाहायला मिळते. मुलांची हौस म्हणून आई-वडिलड्रेस खरेदी करतात. उत्सवाच्या डोंबिवली नगरीत नवरात्रीला दक्षिण भारतीय व मराठी लोकांसह गुजराती लोकांचा कल ड्रेस खरेदी करण्याकडे जास्त आहे, अशी माहिती विक्रेत्या धीरजबेन ठक्कर यांनी दिली आहे. ड्रेसला शोभेसे आॅक्साइड दागिने बाजारात मिळतात. त्याचीही लगेच खरेदी होते. यात कानातले, गळ््यातले, यासोबत निआॅन कड्यांची रंगसंगती खूप खुलून दिसते. मोती, खडे, कुंदन लावलेल्या दोन कड्यांची जोडी, कपाळावर बिंदी व जाडे पैंजण तसेच चनिया चोळीवर मॅचिग असे कंबरपट्टे देखील आहेत. त्यातही मोती आणि मेटलबरोबरच वेलवेटचे गोल लावलेले किंवा चौकानी मेटलचे कंबरपट्टे देखील बाजारात दिसतात.अनेक आजी-आजोबा त्यांच्या परदेशातील नातवडांसाठी ड्रेस खरेदी करण्यापूर्वी बाजारात जातात. ड्रेसचा फोटो काढून व्हॉटस् अपवर परदेशी पाठवितात. नातवाच्या आई बाबांकडून होकार आला की ड्रेस खरेदी करून तो परदेशात पाठविला जातो. ही तयारी नवरात्रीच्या आठ दिवसापूर्वी सुरू होते.भाड्याच्या ड्रेसला संसर्गजन्य आजारांचा ब्रेकनवरात्री उत्सवाकरिता भाडयाने ड्रेस घेण्याकडे जास्त कल होता. एका दिवसाला दीडशे रूपये भाडे आकाराले जात होते. शहरात भाड्यावर कपडे देणारे अनेक ड्रेसवाले आहेत. मात्र सध्या संसर्गजन्य आजाराला भीऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी भाड्याचा ड्रेस घेणे टाळले जाते. त्यापेक्षा साध्या ड्रेसवर अथवा विकत खरेदी केलेल्या नव्या ड्रेसवर गरबा व दांडिया खेळण्यास पसंती दिली जात आहे.