शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ... लॉकडाऊनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला मुस्लीम व्यापाऱ्यानं बनवलं लखपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 22:20 IST

मुस्लिम व्यापाऱ्याने हे कलिंगड खरेदी करून या फक्त तरुण शेतकऱ्याला फक्त मदतीचा हातच दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रचिती देखील पाहायला मिळाली आहे.

ठळक मुद्देमुस्लिम व्यापाऱ्याने हे कलिंगड खरेदी करून या फक्त तरुण शेतकऱ्याला फक्त मदतीचा हातच दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रचिती देखील पाहायला मिळाली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट पसरल्याने सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेसह शेत माल व फळ विक्रीला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर येथुन भिवंडीतील मुस्लिम बहुल शहरात रमजान सणात तयार केलेले विशिष्ट जातीचे कलिंगड विक्रीसाठी घेऊन आला होता. या तरुण व प्रगतशील सुशिक्षित शेतकऱ्याचे कलिंगड चार पाच दिवस उलटून देखील विक्री झाली नसल्याने तरुणाची मेहनत वाया जाऊ नये म्हणून या तरुण प्रगतशील शेतकऱ्याकडून सर्वच्या सर्व तब्बल दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेऊन तरुण होतकरू शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न भिवंडीतील मुस्लिम व्यापाऱ्याने केला आहे. 

मुस्लिम व्यापाऱ्याने हे कलिंगड खरेदी करून या फक्त तरुण शेतकऱ्याला फक्त मदतीचा हातच दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रचिती देखील पाहायला मिळाली आहे. अहमदनगर येथील तरुण व प्रगतशील शेतकरी सुरज भालसिंग यांनी आपल्या दिड एकर शेतात तब्बल सात ते आठ हजार कलिंगडाची रोपे लावून कलिंगडचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कलिंगड आधुनिक व आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पाठविली जाणारी कलिंगड आहेत. आरोही आणि विशाल अशा दोन जातींची हि कलिंगड आहेत. आरोही जातीचे कलिंगड हे वरून हिरवे तर कापल्या नंतर पिवळे तर विशाल या जातीचे कलिंगड हे वरून पिवळे तर कापल्या नंतर लाल अशा प्रकारची वेगवेगळ्या जातीची हि कलिंगड भरपूर पौष्टिक सत्व असलेली आहेत.                  शेतकरी सूरज भालसिंग यांनी या कलिंगड पिकांसाठी खुप मेहनत घेतली होती. आता ही सर्व कलिंगड बाजारात विकण्यासाठी तयार देखील झाली होती. मात्र, राज्यात कोरोना संकटामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे कलिंगड विकायची कशी आणि कुठे या चिंतेत शेतकरी होते. अखेर रमजान महिना असल्याने भिवंडी सारख्या मुस्लिम बहुल शहरात कलिंगड विकली जातील या आशेवर या शेतकऱ्यांनी अहमदनगर येथून ट्रक भर कलिंगड भिवंडीत विकण्यासाठी आणले होते. मात्र, तीन चार दिवसांपासून कलिंगडांची विक्री होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर भिवंडीतील व्यावसायिक वाहिद खान यांचा या कलिंगडांवर लक्ष गेले व त्यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस केली.                भिवंडीत कलिंगड विक्रीसाठ आलेला शेतकरी सुरज भालसिंग हा सुशिक्षित असून शेतीत नवा प्रयोग करावा यासाठी कलिंगडाच्या नव्या जातीचे पीक घेतले मात्र लॉकडाऊनमुळे आमची सर्व मेहनत वाया जाईल, अशी भीती तरुण शेतकरी सुरज यांनी भिवंडीचे व्यावसायिक वाहिद खान यांच्याकडे व्यक्त केली. अखेर वाहिद खान यांना या तरुण शेतकऱ्यांचा कळवळा आल्याने त्यांनी तरुण शेतकऱ्यांची सर्वच्या सर्व दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेतली. भिवंडीत आणलेल्या कलिंगडसाठी सुरज यांना ९० ते ९५ हजार भाव येणे अपेक्षित असतांना वाहिद यांनी सूरज यांना या सर्व कलिंगडाची दोन लाखपेक्षा अधिक रक्कम देऊन ही सर्व कलिंगड खरेदी केली. व्यवसायिक वाहिद यांनी सर्व कलिंगड खरेदी करून या तरुण शेतकऱ्यांना मदतीचा हातच नव्हे तर ऐन लॉकडाऊन व रमजान महिन्यात हिंदू मुस्लिम एकात्मता दाखवून दिली व सर्व कलिंगड खरेदी केल्याने शेतकरी सूरज यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. 

दरम्यान, शेतीत काहीतरी नवीन उपक्रम राबवावे यासाठी कलिंगडाच्या नव्या जातीचे पीक घेतले , त्यासाठी खूप मेहनत देखील घेतली मात्र लॉकडाऊन मुळे सर्व वाया जाणार म्हणून भिवंडीत आलो आणि वाहिद खान यांनी चढ्या भावाने सर्व कलिंगड खरेदी केल्याने खुच आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया अहमदनगर येथी तरुण शेतकरी सुरज भालसिंग यांनी दिली आहे. तर चार दिवसांपासून हि कलिंगड आणि या शेतकऱ्यांना मी पाहतो आहे मात्र त्यांच्या कलिंगडाची विक्री होत नसल्याने या तरुण शेतकऱ्यांकडे विचारपूस केली असता हे तरुण सुशिक्षित शेतकरी असल्याचे समजले त्यांनी मेहनतीने शेती करून कलिंगडाचे पीक घेतले असल्याचे समजले. मात्र लॉकडून मुळे त्यांच्या मालाची विक्री होत नसल्याने मी त्यांचे सर्व कलिंगड खरेदी केली आहे, माझ्या या छोट्याशा मदतीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले यातच मला समाधान मिळाले असून तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे. सध्या पवित्र रमजान सण सुरु आहे त्यातच कोरोनामुळे शहरात पोलीस दिवस रात्र मेहनत करत आहेत त्यामुळे हि सर्व कलिंगड मी गरीब गरजूंना व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करणार आहे अशी प्रतिक्रिया व्यावसायिक वाहिद खान यांनी दिली आहे.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमRamadanरमजानbhiwandiभिवंडी