शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुल वहातूकीसाठी होणार खुला, जड वहानांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:22 IST

भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा ...

ठळक मुद्देउड्डाणपुलाच्या स्लॅब उखडून पडले होते भगदाडदुरूस्तीसाठी पंधरा दिवस उड्डाणपुल होता बंददुरूस्तीनंतर पुलाच्या दोन्ही बाजूला गडर

भिवंडी: शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.शहरात बारा वर्षापुर्वी बांधलेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग उखडून, या पुलास पंधरादिवसांपुर्वी (५ सप्टेंबर)भगदाड पडले होते. एस.टी.स्थानकासमोरील या उड्डाणपुलाखाली असलेल्या शौचालयाजवळ सकाळच्या सुमारास पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने शहरात हाहाकार माजला होता. याच दरम्यान नागरिकांनी उड्डाणपुलावरील वहातूक ताबडतोब बंद केली. महानगपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी या घटनेची दखल घेत व्हिजेआयटी या संस्थेस लेखी पत्र देऊन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट देण्यास सांगीतले आहे. हा स्ट्रक्चरल आॅडीटचा रिपोर्ट पालिकेकडे पुढील आठवड्यात येणार असल्याची माहिती आयुक्त हिरे यांनी दिली.तसेच एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी देखील उड्डाणपुलाची माहिती घेऊन पुलाच्या दुरूस्ताबाबत सुचना केल्या. दरम्यान मनपा आयुक्तांनी उड्डाणपुलाचे ठेकेदार जे.कुमार अ‍ॅण्ड कंपनी यांना पाचारण करून त्यांच्याकडून पुलाची तपासणी करून त्यांच्याकडून पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. हा विषय तांत्रीक असल्याने पुलाचे बांधकाम करणाºया जे अ‍ॅण्ड कंपनीने ही दुरूस्ती पंधरा दिवसांत केली. तर पालिकेने उड्डाणपुलावर असलेले खड्डे बुजविण्याकरीता चार लाखाचे डांबरीकरण केले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी पाण्याचे पाईप साफ केले. महापालिकेने केलेली दुरूस्ती टिकावी आणि पुलाचे अधीक नुकसान होऊ नये म्हणून काही महिन्यांसाठी पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर लावण्याचे काम सुरू केले असुन हे काम आज गुरूवार रोजी पुर्ण होणार आहे. उद्या शुक्रवार पासून या राजीवगांधी स्मृती उड्डाणपुलावरून नियमीत वहातूक सुरू होणार आहे.असे मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगीतले. पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर आहे तो पर्यंत या पुलावरून जाणाºया जडवहानांना आपोआपच मर्यादा येणार आहे. परंतू या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढवायचे असल्यास या पुलावर जड व अवजड वहानांना कायमची बंदी घालावी,अशी मागणी शहरातील विविध स्तरांतून होऊ लागली आहे.राजीवगांधी उड्डाणपुलाला भगदाड पडलेल्या घटनेस पंधरा दिवस झाले. उड्डाणपुलावर साचणा-या पाण्याचा निचरा करणे तसेच योग्य दुरूस्ती करणे या बाबत पालिकेच्या अभियंत्यांना हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप जनमानसांतून होत आहे. या घटनेनंतर पालिकेत स्थायी समितीची सभा आणि महासभा देखील झाली. परंतू उड्डाणपुलाची निगा व दुरूस्ती करण्यात हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांना व अभियंत्यांना कोणी नगरसेवकांनी जाब विचारला नाही. उड्डाणपुलाची ही घटना एकाच दिवसांत घडणारी नसुन अनेक महिने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना भोगावा लागला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणा-या अभियंत्यांवर व अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाई करावी,अशी मागणी नागरिक विकास प्रतिष्ठानचे रामदास दानवले यांनी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRajiv Gandhiराजीव गांधी